
दैनिक स्थैर्य । दि. २५ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शनिवार दि. 26 व सोमवार दि. 28 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ निवेदक दीपक वेलणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ही विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले विविध उपक्रम, अमराठी लोकांना मराठी आपलीशी वाटावी यासाठी करण्यात येणारे प्रयत्न, मराठी भाषेच्या धोरणाची अंमलबजावणी, मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालये करीत असलेली कामे आदी विषयांची माहिती, मराठी भाषा मंत्री श्री. देसाई यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.