दैनिक स्थैर्य | दि. ०७ नोव्हेंबर २०२१ | मुंबई | ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एअर’ या ॲपवर सोमवार दि. ८ आणि मंगळवार दि. ९ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.
दक्षता जनजागृती सप्ताह आयोजनामागील हेतू, भ्रष्टाचार किंवा लाच यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची रचना व कार्यपद्धती, भ्रष्टाचारास आळा घालण्यासाठी या विभागाची प्रतिबंधात्मक उपाययोजना, कोणी लाच मागत असेल तर तक्रार कोठे करावी, सापळा कार्यपद्धती म्हणजे काय आदी विषयांची सविस्तर माहिती डॉ.पंजाबराव उगले यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.