दैनिक स्थैर्य । दि. २७ जून २०२२ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर मंगळवार दि. 28 जून, बुधवार 29 जून व गुरूवार 30 जून 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांबरोबरच मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचा सामाजिक न्याय विभाग कार्यरत आहे. विभागामार्फत अनेक योजना राबविल्या जात असून गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम देखील राबविण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.