‘दिलखुलास’ कार्यक्रमात १०, ११ व १३ मार्चला उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत


दैनिक स्थैर्य । १० मार्च २०२३ । मुंबई । राज्याच्या विकासाला गती देणारा, कृषी क्षेत्र, पायाभूत सुविधा भक्कम करणारा पंचामृत अर्थसंकल्प आज सादर केला असून या अर्थसंकल्पामुळे राज्यातील कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, रोजगार निर्मिती, पर्यावरण, पर्यटन अशा विविध घटकांना बळकटी मिळणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

विधिमंडळात उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीतून त्यांनी अर्थसंकल्पाविषयी विस्तृत माहिती दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील शेतकरी बांधव, महिला, अनाथ बालके, दिव्यांग बांधव, समाजातीलवंचित, उपेक्षित घटकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हा अर्थसंकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे. शेतकरी बांधव विकासाचाकेंद्रबिदू असून शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲप वर शुक्रवार दि. 10 व शनिवार दि. 11 व सोमवार दि. 13 मार्च 2023 रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार धर्मेंद्र जोरे यांनी ही मुलाखत घेतली आहे.


Back to top button
Don`t copy text!