दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांची मुलाखत


दैनिक स्थैर्य । दि. ०२ मार्च २०२२ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पुणे कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर या मोबाईल अॅपवर गुरुवार दि. ३ मार्च व शुक्रवार दि. ४ मार्च २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ निवेदक सुप्रिया कुऱ्हाडे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पुणे प्रादेशिक कार्यालयांतर्गत उपलब्ध पर्यटक निवास व उपहारगृहे, पुणे विभागातील पर्यटन स्थळे, शासकीय कर्मचाऱ्यांकरिता असलेल्या सवलती, पर्यटक निवासामध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा, भविष्यातील नवीन प्रकल्प, योजना आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. दीपक हरणे यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!