‘दिलखुलास’ कार्यक्रमात दिनेश वाघमारे यांची २१ व २२ जुलैला मुलाखत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२२ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ या कार्यक्रमात ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर  गुरूवार दि. 21 जुलै व शुक्रवार 22 जुलै 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त केंद्र शासनाच्या वतीनं आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘उज्ज्वल भारतउज्ज्वल भविष्य’ ऊर्जा महोत्सव पॉवर @2047 होणार आहे.  राज्यातही या महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. हा महोत्सव काय आहेत्याचा उद्देश काय आहेयाविषयी सविस्तर माहिती प्रधान सचिव श्री.वाघमारे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!