अग्निशस्त्रांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पदार्फाश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


१९ लाख ८९ हजारांचे ४२ पिस्तूल,६६ काडतुसे जप्त

स्थैर्य, पुणे, दि. १६ : महाराष्ट्रातील गुन्हेगारी टोळ्यांना पिस्टल, गावठी कट्टे अशा अग्निशस्त्रे विकणार्‍या मध्यप्रदेशातील टोळीचा पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी 26 जणांपैकी 15 जणांच्या पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-4 च्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून 19 लाख 89 हजारांची पिस्टल व व गावठी कट्टे व 66 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. या टोळीकडून कराड तालुक्यातील एकाने शस्त्र खरेदी केल्याचेही निष्पन्न झाले आहे.

याबाबत माहिती अशी, मार्च महिन्यात सांगवी येथील गणेश माळी याला अवैध अग्निशस्त्रासह अटक करून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याने ही शस्त्रे ग्यानोबा उर्फ गोटु मारुती गिते, रा. परळी, जि.  बीड याच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाल्याने त्यासही अटक झाली होती. या दोघांकडुन एकुण 06 पिस्टल व गावठी कट्टे व 15 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले होते. तपासादरम्यान गोटु गिते याने ही शस्त्रे मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील एका सरदार नावाच्या व्यक्ती कडुन शस्त्रे आणल्याचे सांगितले होते. त्यानंतर मार्च महिन्यात एक पथक मध्यप्रदेशात गेले होते. परंतु, आरोपी मिळुन आला नाही. दरम्यान, देशभरात लॉकडाऊन सुरू झाल्याने तपासावर मर्यादा आल्या होत्या.

दरम्यान, गुन्हे शाखा युनिट -4चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सपोनि अंबरिष देशमुख व पोलीस शिपाई प्रशांत सैद यांनी मध्यप्रदेश येथिल आरोपीच्या अनुषंगाने बारकाईने तांत्रिक विश्‍लेषण करुन मध्यप्रदेश पुन्हा पथक पाठवले. सदर पथकाने तेथे जावून वेशांतर करून आरोपींची खडानखडा माहिती घेतली. यावेळी हे प्रकरण गंभीर असून त्याची व्याप्ती मोठी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे लॉकडाऊन शिथील होताच याबाबत पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ  व सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजाराम पाटील यांच्याशी चर्चा करून मध्य प्रदेशातील शस्त्रे पुरवणार्‍या मुख्य आरोपीला जेरबंद करण्याच्या अनुषंगाने अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला.

आरोपींना पकडताना प्रतिहल्ला होण्याची शक्यता लक्षात घेवुन वरिष्ठ पोनि. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि देशमुख व पथक संपुर्ण तयारीनिशी धार जिल्ह्यातील सिंघाना (म. प्र.) येथे रवाना झाले. पथकाने तेथे 2 दिवस तळ ठोकुन वेशांतर करुन मुख्य आरोपी मनिसिंग गुरमुख सिंग भाटीया यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून 11 गावठी पिस्टल व 22 जिवंत काडतुसे जप्त केली. मनिसिंग आणि त्याचा साथीदार कालुसिंग जसवंत सिंग रा. सिंघाना याने महाराष्ट्रातील कुश नंदकुमार पवार रा. तळेगाव दाभाडे व प्रसन्न ज्ञानेश्‍वर पवार रा. गोडुबे (शिरगाव), आकाश उर्फ बाळा जगन्नाथ वाघमोडे रा. कुर्डूवाडी, जि.सोलापुर व योगेश विठ्ठल कांबळे, रा. परांडा, जि. उस्मानाबाद तसेच गोद उर्फ ग्यानोबा मारुती गिते, रा. परळी, जि. बीड या टोळी प्रमुखांना मोठया प्रमाणात अग्निशस्त्रे विकल्याचे निष्पन्न तपासात झाले. त्यामुळे पोलिसांनी तातडीने वेगवेगळी पथके तयार करुन वरील सर्व आरोपींना अटक केली.

कुश पवार व प्रसन्न पवार या टोळी प्रमुखांनी मध्यप्रदेश येथून एकुण 22 पिस्टल, गावठी कट्टे आणली होती. ही शस्त्रे आकाश पडळघरे, रा. रिहे, ता. मुळशी, प्रकाश उर्फ पप्पु किसन मांडेकर, वय -20 वर्ष रा. आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे, ओंकार ऊर्फ अभिजीत बाजीराव ढमाले वय -28 रा. उमाले चाळ, जुनी सांगवी, संतोष राठोड रा. तळेगाव दाभाडे, तुषार महादु बावकर वय 25 रा. कासारसाई, ता. मुळशी, शिवकुमार मुरगन उर्फ बल्ली रा. आंबेडकर नगर, देहुरोड, सिराज सलीम शेख वय 34 रा. आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे यांना विकली आहेत. यापैकी कुश पवार, प्रसन्न पवार, प्रकाश माडेकर, सिराज शेख यांना अटक करून त्यांच्याकडुन 18 पिस्टल, गावठी कट्टे व 22 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

आकाश उर्फ बाळा जगन्नाथ वाघमोडे व योगेश विठ्ठल कांबळे या टोळी प्रमुखांनी मध्यप्रदेशातून एकुण 27 पिस्टल, गावठी कट्टे आणले होते. ही शस्त्रे त्यांनी अक्षय दिलीप केमकर वय 28 रा. मेडद, ता. माळशिरस, जि. सोलापुर, योगेश ऊर्फ आबा बापुराव तावरे वय 24 रा. माळेगाव, ता. बारामती, चेतन ऊर्फ मामा गोविंद लिमन वय 28 रा. लिंबाची तालीम, ता. हवेली, जि. पुणे, प्रज्ञेश संजय नेटके, रा. भोर आळी, चिंचवडगाव, मयूर अनिल घोलप रा. बिबवेवाडी, पुणे, विकी अनिल घोलप रा. बिबवेवाडी, राजु भाळे रा. इंदापुर, सोमनाथ ऊर्फ सोमा रमेश चव्हाण, रा. काळगाव, ता. कराड. (याच्यावर 13 गुन्हे दाखल असून सातारा जेलमध्ये आहे.) यांना विकली आहेत. त्यांच्याकडून 7 पिस्टल/गावठी कट्टे  व 7 जिवंत काडतुसे तसेच शस्त्रे आणण्यासाठी वापरलेली सेलोरो कार जप्त केली.शिवाय ग्यानोबा उर्फ गोटु मारुती गिते याच्याकडून यापुर्वीच 6 पिस्टल / गावठी कट्टे व 15 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

या कारवाईत एकुण 26 आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला आहे तर 15 जणांना अटक झाली आहे. 42 पिस्टल, गावठी कट्टे व 66 जिवंत काडतुसे व सेलोरो कार असा एकूण एकुण 19 लाख 89 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवाय आरोपींवर यापुर्वीच्या दाखल गुन्ह्यात विविध पोलीस ठाण्यात 14 पिस्टल जमा आहेत.

ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहा. पोलीस आयुक्त राजाराम पाटील गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा, युनिट -4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सपोनि अंबरिष देशमुख, हवालदार प्रविण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, अदिनाथ मिसाळ पोना, संतोष असवले, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मो. गौस नदाफ, बासुदेव मुंडे, पोशि शायरसिद्ध पांढरे, प्रशांत सैद, सुनिल गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, नागेश माळी, राजेंद्र शेटे, तांत्रिक विश्‍लेषण विभाग गुन्हे शाखा यांनी केली. सपोनि अंबरिष देशमुख तपास करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!