डाक विभागाद्वारे आता इंटरनेट बँकिंग व मोबाईल बँकिंग ‍सुविधा उपलब्ध

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि. २०: सध्याच्या कोरोना प्रादुर्भावामुळे व सोशल डीस्टसींगमुळे बचत व्यवहार करणे जिकीरीचे काम होऊन बसले आहे. यावर उपाय म्हणून भारतीय डाक विभागाने बचत खात्यामार्फत इंटरनेट बँकींग व मोबाईल बँकींगची सेवा उपलब्ध करुन दिली असून याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर, सातारा विभाग यांनी केले आहे.

डाक विभागाच्या सर्व ग्राहकांना घरबसल्या बँकिंग व्यवहार करण्यासाठी घेता येणार आहे. इंटरनेट बँकींग व मोबाईल बँकींगद्वारे ग्राहकांना आपल्या पोस्ट ऑफीस सेव्हींग खात्याद्वारे इतर खात्यामध्ये पैसे ट्रान्स्फर करणे तसेच आरडी (आवर्ती ठेव), पीपीएफ इत्यादी खात्यांमध्ये पैसे भरणे याबरोबरच आवर्ती ठेव खाते उघडणे, फिक्स डीपॉझिट करणे अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!