आंतरराष्ट्रीय मुष्टियोध्दा मनोज कुमार यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ सप्टेंबर २०२१ । मुंबई । आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुष्टियोध्दे मनोज कुमार यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला सदिच्छा भेट दिली.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ. का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी मनोज कुमार आणि त्यांचे बंधु तथा प्रशिक्षक राजेश कुमार यांचे स्वागत केले. यावेळी उपसंपादक रितेश भुयार, लघुलेखक कमलेश पाटील, ग्रंथपाल रामेश्वर बरडे उपस्थित होते.

मनोज कुमार यांनी आज केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.  या भेटीत श्रीमती अरोरा यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राद्वारे प्रका‍शित करण्यात येणारी प्रकाशने, प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय, कार्यालयाच्या सोशल मीडियाहून देण्यात येणारी माहिती, दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांशी साधण्यात येणारा समन्वयाबाबत माहिती दिली. तसेच, परिचय केंद्राच्यातवीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही दिली.

यावेळी मनोज कुमार यांनी २०१० मध्ये आयोजित कॉमनवेल्थ गेम्सच्या मुष्टियुध्द स्पर्धेत(लाईटवेट) मिळविलेले सुवर्ण पदक आणि २०१८ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्य पदक मिळवून भारत देशाचा वाढविलेला मान याविषयी माहिती दिली. क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी २०१४ मध्ये त्यांना केंद्र शासनाच्या मानाच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचा प्रसंग सागतांना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.  मनोज कुमार यांनी  २०१२ च्या लंडन  आणि २०१६च्या रियो ऑल्म्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. मनोज कुमार हे २००८ पासून भारतीय रेल्वेच्या अंबाला स्थित क्रीडा विभागात विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.


Back to top button
Don`t copy text!