स्थैर्य, उदगीर, दि. 16 (राहुल शिवाने) : कर्तृत्वाची बुलंद तोफ सर्व संकटांना तोंड देऊन जागतिक विश्वाला ग्रासणारी महामारी कोरोणा विषाणूचा फैलाव या भयानक संकटाला संपूर्ण भारत आज मुकाबला कराण्याच्या तयारीत आहेत. त्यामध्ये कर्नाटक व आंध्र प्रदेश या दोन राज्याच्या सीमेवर लागून असणारा ऐतिहासिक पुरातन उदगीर बाबांच्या वस्तीतील उदगीर तालुका, या उदगीर तालुक्यात गजानन पाटील (उप निरीक्षक उदगीर शहर) आपली कर्तव्य बजावत असताना सगळ्यांन सोबत समजस्यपणा टिकवून ठेवुन आपल्या कर्तव्याची काठी फिरवत असताना अशा कर्तव्यदक्ष व्यक्तीचा गृह विभाग आणि महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांच्यातर्फे आंतरिक सुरक्षा सेवा पदक देऊन गौरवण्यात आले.
त्या मंगलमय प्रसंगाची पुनश्च आत्मउन्नती साहेबांच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी यासाठी आशीर्वादरुपी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना ह.भ .प युवाकीर्तनकार संतोष गिरी महाराज येणकीकर व आदि मान्यवर येणकी गावचे प्रथम नागरिक युवकांचे प्रेरणास्थान ज्ञानेश्वर हरिभाऊ बिरादार तसेच तंटामुक्ती अध्यक्ष माधव गोविंद शेळगे, परमेश्वर बिरादार, राजकुमार बिरादार, सुनील पाटील, सुग्रीव बिरादार या सर्वांच्या उपस्थितीत गजानन पाटील यांचा सत्कार करण्यात आला व पुढील जीवनासाठी आनंदमय शुभेच्छा सर्वांनी दिल्या.