
दैनिक स्थैर्य । 13 मार्च 2025। सातारा । जिल्ह्यामध्ये 1152 आपले सरकार सेवा केंद्र चालविणेसाठी वितरीत करण्यात येणार आहेत.याबाबतच्या अटी व शर्ती,सेवा केंद्र मागणीबाबतचा अर्जाचा नमुना इत्यादी सातारा जिल्हयाचे https://www.satara.gov.in या सकेंतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
आपले सरकार सेवा केंद्र चालविण्यासाठी इच्छुक नोंदणीकृत सी.एस.सी केंद्रचालकांनी विहित केलेल्या अटी शर्तीस अधीन राहुन परीपुर्ण भरलेले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास 4 जानेवारी ते 21 मार्च 2025 या कालावधीत सादर करणेबाबत जाहिरनामा यापुर्वीच प्रसिध्द करण्यात आला होता. आज अखेर 213 आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज प्राप्त झाले आहे.
तरी आपले सरकार सेवा केंद्र चालविण्यास इच्छुकांनी आपले अचुक व परिपुर्ण भरलेले अर्ज सेतु संकलन कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय येथे 21 मार्च पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करण्याचे आवाहन विक्रांत चव्हान उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.