महात्मा बसवेश्वर सामाजिक समता – शिवा पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती आणि संस्था यांनी अर्ज करण्याचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ फेब्रुवारी २०२३ । सातारा । राज्यातील वीरशैव – लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक, समाजप्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार व समाज सेवकांना आणि यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना, महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी वैशाख शुद्ध (अक्षय तृतीया) या दिवशी महात्मा बसवेश्वर यांच्या नावे एक व्यक्ती आणि एका संस्थेला महात्मा बसवेश्वर सामाजिक समता – शिवा पुरस्कार जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिली आहे.

पुरस्कार हा वीरशैव – लिंगायत समाजाकरिता सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन व आर्थिकदृष्टया कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक,  कलावंत, समाज संधटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक तसेच सामाजिक संस्था यांना प्रदान करण्यात येणार आहे.

या पुरस्कारासाठी पुरुष वयोमर्यादा किमान 50 वर्षे तर महिला किमान 40 वर्षे असून सामाजिक संसथेसाठी सदर क्षेत्रातील किमान 10 वर्षे कार्य असा निकष आहे. इच्छुक व्यक्ती  आणि संस्था यांनी सदर वृत्त प्रसिद्ध झालेनंतर दहा दिवसांचे आत सहायक आयुक्त, समाज कल्याण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा कार्यालयामध्ये आपले अर्ज आणि संबंधीत कागदपत्रे सादर करावयाची आहेत, असेही आवाहन श्री. उबाळे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!