
दैनिक स्थैर्य । 11 मार्च 2025 । फलटण । फलटण नगरपरिषद व नगरपरिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 11 रोजी सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत आंतरशालेय क्रीडा स्पर्धा आयोजन नगरपरिषद शाळा क्र. 7 शिवाजीनगर येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे मान्यवरांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरपालिकेच्या विविध वर्गातील खेळाडू सहभागी झाले होते. विजयी संघाला बक्षीस वितरण करण्यात आले.
दरम्यान नगरपालिकेच्यावतीने सोमवार दि. 17 रोजी सांस्कृतिक भवनपाठीमागे मध्यवर्ती हॉल येथे सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती नगरपालिकेच्यावतीने देण्यात आली. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.