माण तालुक्यात उन्हाळ्याची तीव्र चाहूल

ग्रामीण भागात पाण्याची टंचाई, जनावरांसाठी चार्‍याची कमतरता


स्थैर्य, 8 मार्च, सातारा – माण तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली असून दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत तापमानात लक्षणीय वाढ झाली असून नागरिकांना उष्माघाताचा धोका जाणवू लागला आहे. ग्रामीण भागात पाण्याची टंचाई, जनावरांसाठी चार्‍याची कमतरता आणि विहिरींच्या पाण्याची घटती पातळी यामुळे परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दुपारच्या कडक उन्हामुळे बाजारपेठा, शासकीय कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी वर्दळ कमीझालेली दिसते. शेतकरी वर्ग सकाळी लवकर आणि सायंकाळी उशिरा शेतीची कामे करत आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, उष्णतेमुळे डोकेदुखी, अशक्तपणा, चक्कर येणे, उलट्या होणे अशी लक्षणे दिसू शकतात. अशा वेळी तात्काळ सावलीत विश्रांती घ्यावी आणि जवळच्या दवाखान्यात संपर्क साधावा. शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पुरेसे पाणी, ताक, स् लिंबूपाणी यांचे सेवन करावे. हलके, स सूती कपडे वापरावेत आणि दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे.

दरम्यान, नागरिकांनी पाण्याचा अपव्यय उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी सर्वांनी सामूहिक ज जबाबदारीची जाणीव ठेवणे गरजेचे पु आहे. उन्हाळा हा निसर्गाचा भाग असला तरी योग्य खबरदारी घेतल्यास त्याचे दुष्परिणाम टाळता येऊ शकतात. माण तालुक्यातील नागरिकांनी सजग राहून आरोग्य आणि पाण्याची बचत याकडे क विशेष लक्ष द्यावे. ’सावध रहा, सुरक्षित रहा उन्हाळ्यात आरोग्याची काळजी हीच खरी खबरदारी.’


Back to top button
Don`t copy text!