एका‍त्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2023-24 क्षेत्र विस्तार कार्यक्रम; फळे, फुले, मसाला पिके लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २ जून २०२३ | सातारा | एका‍त्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फळे, फुले, मसाला पिके लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन कार्यक्रम राबविण्यात येतो. यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला पिके लागवड व आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळापिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन या बाबींचा समावेश आहे.

राज्यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे उत्पादन वाढविणे तसेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे या दृष्टीने हा कार्यक्रम राबविण्यात येतो. या घटकांचे अनुदान खालीलप्रमाणे आहे.

फुले लागवड कट फ्लॉवर्स – अल्प भुधारक शेतकरी- एक लाख रुपये प्रति हेक्टरी- एकुण खर्चाच्या चाळीस टक्के किंवा कमाल चाळीस हजार रूपये प्रति हेक्टर, इतर शेतकरी- एक लाख रुपये प्रति हेक्टर-एकुण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल पंचवीस हजार रूपये

कंदवर्गीय फुले- अल्पभुधारक शेतकरी- एक लाख 50 हजार रुपये प्रति हेक्टर – एकुण खर्चाच्या चाळीस टक्के किंवा कमाल 60 हजार रुपये प्रति हेक्टर, इतर शेतकरी- एक लाख ५० हजार रुपये प्रति हेक्टर- एकुण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल रु.37 हजार 500 रूपये प्रति हेक्टर

सुटी फुले – अल्पभुधारक शेतकरी- चाळीस हजार रूपये एकुण खर्चाच्या चाळीस टक्के किंवा कमाल सोळा हजार रुपये प्रति हेक्टर, इतर शेतकरी-चाळीस हजार रुपये प्रति हेक्टर-एकुण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 10 हजार रुपये प्रति हेक्टर

मसाला पिक लागवड- बिया वर्गीय व कंद वर्गीय मसाला पिके- 30 हजार रुपये रुपये प्रति हेक्टर, एकुण खर्चाच्या चाळीस टक्के रक्कम 12 हजार रुपये प्रति हेक्टर. बहुवर्षिय मसाला पिके- 50 हजार रुपये प्रति हेक्टर, एकुण खर्चाच्या चाळीस टक्के रक्कम 20 हजार रुपये प्रति हेक्टर

विदेश फळपिक लागवड-डॅगनफ्रुट- ४ लाख रूपये प्रति हेक्टर-एकुण खर्चाच्या चाळीस टक्के किंवा कमाल एक लाख ६० हजार रुपये प्रति हेक्टर, स्ट्रॉबेरी- २ लाख ८० हजार रूपये प्रति हेक्टर, एकुण खर्चाच्या चाळीस टक्के किंवा कमाल एक लाख 12 हजार रूपये प्रति हेक्टर, अवॅकॅडो- एक लाख रूपये एकुण खर्चाच्या चाळीस टक्के व कमाल 40 हजार रूपये प्रति हेक्टर.

जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन – जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन ४० हजार रूपये प्रति हेक्टर, खर्चाच्या ५० टक्के व जास्तीत जास्त २० हजार रुपये प्रति हेक्टर

विदेशी फळे, फुले,मसाला लागवड करण्यास इच्छुक व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू,संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी संबधित नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!