ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालकांना रिफ्लेक्टर लावण्याच्या सूचना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १३ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सर्व स्टाफसह श्री दत्त इंडिया कारखाना साखरवाडी तळावर व स्वराज कारखाना उपळवे वाहन तळावर जाऊन त्या ठिकाणी उभ्या असलेल्या सर्व ट्रॅक्टरचालकांचे ट्रॅक्टरला रिफ्लेक्ट लावण्याबाबत समुपदेशन केले.

यावेळी पोलीस निरीक्षक यांनी खालील प्रमाणे सूचना दिल्या :

  • कोणताही ट्रॅक्टर भरलेला किंवा खाली हा विना रिफ्लेक्टर मिळून आल्यास वाहतूक कायद्याप्रमाणे कारवाई होणार.
  • कोणत्याही ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर लावलेला नसेल आणि अपघात झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल.
  • सर्व ट्रॅक्टरचालकांनी कर्णकर्कश् टेप रेकॉर्डर काढून घ्यावेत अन्यथा त्यांच्यावर वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल.
  • कोणताही ट्रॅक्टरचालक हा दारू पिऊन वाहन चालवणार नाही.

प्रत्येक कारखान्याच्या रस्त्यावर वाहतूक पोलिसाची नेमणूक करून संबंधितावर कारवाई करण्यात येईल.

यावेळी पोलिसांनी व श्री दत्त कारखान्याचे एमडी श्री. जगताप व स्वराज कारखान्याचे श्री. डफळ यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी रिफ्लेक्टर भरलेल्या ट्रॅक्टरला लावून अनौपचारिक उद्घाटन केले. तसेच प्रत्येक ट्रॅक्टरच्या पुढील बाजूस रिफ्लेक्टरपट्टी लावावी, याबाबत सूचना दिल्या.

दरम्यान, फलटणमधील तमाम नागरिकांना विनंती करण्यात येते की, जोपर्यंत ऊस वाहतूक सुरू आहे तोपर्यंत प्रत्येकाने डोक्यामध्ये हेल्मेट घालावे. हेल्मेटला ओझे समजू नका, यमदूतापासून ते आपली सुटका करणारे ब्रह्मास्त्र आहे. उद्यापासून याबाबत सक्त कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!