
दैनिक स्थैर्य । 10 मार्च 2025। फलटण । कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचे राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले आहे. यानिमित्त त्यांचा मंगळवार दि. 11 रोजी सकाळी 10.30 वाजता सजाई गार्डन, जाधववाडी येथे नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, प्रभारी अधिकारी, फलटण शहर, फलटण ग्रामीण, खंडाळा, शिरवळ, लोणंद पोलीस ठाणे, फलटण व खंडाळा तालुक्यातील पोलीस पाटील व नागरिक उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.