सिव्हिल हॉस्पिटलमधील कामाची जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून पाहणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सोलापूर, दि.18 : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी श्री छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) बेडची संख्या वाढवण्यात येणार आहे.  त्याबाबतच्या कामकाजाची आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि महापालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर यांनी पाहणी केली.

कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी सोलापूर शहरातील बेडची संख्या वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.  त्या अनुषंगाने शंभरकर यांनी सिव्हील हॉस्पिटलच्या बी आणि सी ब्लॉकमध्ये काही बेड वाढवता येतात का याबाबत चर्चा केली होती. त्यानुसार तेथे आणखी 100 बेड वाढवण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने काम सुरु आहे. या कामाची प्रगती पाहण्यासाठी  शंभरकर आणि शिवशंकर यांनी आज  भेट दिली. यावेळी अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार, डॉ. राजेश चौगुले आदी उपस्थित होते.

सिव्हिल हॉस्पिटलमधील बी ब्लॉकमध्ये 20 बेड आयसीयू आणि 80 बेड ऑक्सिजन सुविधेने विकसीत करण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक असणारे फेरबदल करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुरु आहे. हे काम गतीने पूर्ण करावे, अशा सूचना शंभरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या.

या नव्या वॉर्डमध्ये उपचारासाठी सुमारे पाचशे डॉक्टर, कर्मचारी, नर्स यांची आवश्कता आहे.  हे मनुष्यबळ  उपलब्ध करुन त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर  यांनी दिल्या.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!