स्वच्छ मुख अभियानाच्या बोधचिन्हाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अनावरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०३ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । आधुनिक जीवन पद्धतीमध्ये जेवणानंतर चूळ न भरता फिंगर बोलमध्ये हात धुण्याची पद्धत प्रचलित झाली आहे. दंतरोग्याच्या दृष्टीने ही पद्धत अतिशय चुकीची असून दंत वैद्यकांनी ही पद्धत बंद करण्यासाठी जनजागृती करावीअसे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.

दंतवैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेबद्दल राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते नुकतेच राज्यातील दंतवैद्यकांना एक्सलन्स इन डेन्टिस्ट्री‘ पुरस्कार राजभवन येथे प्रदान करण्यात आलेत्यावेळी राज्यपाल बोलत होते.  मेडियुष‘ या दंतवैद्यकांच्या संघटनेच्यावतीने हे पुरस्कार देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाच्या बोधचिन्हाचे तसेच बोधवाक्याचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

स्वच्छ मुख अभियान‘ हा चांगला उपक्रम असून असे अभियान निरंतर राबवावे. वैद्यकीय सेवा हा एक पवित्र व्यवसाय असून त्याचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करावे असे राज्यपालांनी सांगितले.  

कार्यक्रमाला मेडीयुषचे सह-संस्थापक डॉ गोविंद भतानेवैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ विवेक पाखमोडे,  ‘ओरल हेल्थ मिशनचे डॉ दर्शन दक्षिणदासडॉ विश्वेश ठाकरे,  इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉ अशोक ढोबळेसौंदर्यवर्धक व कृत्रिम दंतशास्त्र तज्ज्ञ  डॉ संदेश मयेकरकालिका स्टीलचे संचालक गोविंद गोयलतसेच दंतचिकित्सा क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!