कोटेश्वर मंदिरातील शिलालेख संग्रहालयात


दैनिक स्थैर्य । 18 मे 2025। सातारा । सातार्‍यातील कोटेश्वरमंदिरासमोर 1779 सालचा एक शिलालेख आढळून आला आहे. या शिलालेखावरील मजकूर देवनागरी लिपीत असून, तो नुकताच छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालांकडे सुपुर्द करण्यात आला आहे. याठिकाणी शिलालेखाचे संवर्धन केले जाणार असल्याची माहिती अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली.

शहराला ऐतिहासिक वारसा लाभल्याने इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा येथे आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत. कोटेश्वर मंदिर यापैकीच एक. सातारा शहराचे संस्थापक शाहू महाराज थोरले यांच्या कार्यकाळात या मंदिराची उभारणीझाली. या मंदिराच्या दर्शनी भागात असलेल्या एका पारावर देवनागरी लिपीतील शिलालेख इतिहास अभ्यासक अनिल दुधाणे यांनी दृष्टिक्षेपात आणला. दोन फूट रुंदी व एक फूट उंचीचा हा शिलालेख 1779 मधील आहे. अनिल दुधाणेयांनी या शिलालेखाचे वाचन करून याची माहिती अभिरक्षक प्रवीण शिंदे यांना दिली. यानंतर प्रवीण शिंदे व कर्मचार्‍यांनी या शिलालेखाची पाहणी केली. मंदिराचे संतोष पुजारी, सुभाष गायकवाड यांनी हा शिलालेख संग्रहालयाच्या ताब्यात दिला आहे.


Back to top button
Don`t copy text!