शर्यतीच्या बैलाची अज्ञातांकडून अमानुष हत्या


दैनिक स्थैर्य । दि. ६ जुलै २०२१ । कुडाळ। जावळी तालुक्यातील सरताळे परिसरात क्रूरतेने बैलाचा पाय तोडुन गळ्याला दोरी बांधून त्याला फास लावून क्रूरतेने हत्या केली असल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. काल रात्री हा प्रकार घडला असल्याची नोंद कुडाळ पोलिस स्थानकामध्ये झाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बैलाच्या अंगावर कुर्‍हाडीचे घाव घालून व शेपूट तोडल्याचे दिसून येत आहे. यानंतर बैलाच्या अंगावर गुलाल टाकून त्याला निर्दयीपणे फास लावून क्रूरतेने हत्या करण्यात आली आहे. बैलाचा फास गळ्याभोवतीच होता.

दरम्यान, घटनास्थळावर कुडाळ पोलिसांनी पंचनामा केला व अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुण खिल्लार जातीच्या बैलाची अशा पद्धतीने अमानुष हत्या करण्याचा जावळ तालुक्यातला हा पहिलाच प्रकार समोर आल्याने नेमका हा बैल कोणाचा आहे? मुक्या प्राण्यावर निर्दयपणे वार करून त्याला करणारा नेमका कोण आहे? याचा तात्काळ तपास करावा, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून होवू लागली आहे. यासंदर्भात अधिक तपास हेडकॉन्स्टेबल घोरपडे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!