दैनिक स्थैर्य | दि. १२ नोव्हेंबर २०२१ | सातारा | सातारा जिल्हा बॅकेच्या अकरा जागा बिनविरोध करणाऱ्या सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाच्या सहकार पॅनेलला कपबशी चिन्ह देण्यात आले आहे. तर बंडखोर उमेदवारांना किटली विमान ट्रॅक्टर टेबल अशी चिन्हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गुरुवारी जाहीर केली .
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दहा जागांसाठी वीस उमेदवार रिंगणात आहेत . जिल्हा बॅकेचे 1963 मतदार दि 21 नोव्हेंबर रोजी मतदान करणार असून दि 23 रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे .
या निवडणूक प्रक्रियेत चिन्ह वाटपाचा पुढचा टप्पा पार पाडण्यात आला निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी गुरुवारी चिन्हवाटप जाहीर केले . राष्ट्रवादी च्या सहकार पॅनेलला कपबशी हे चिन्ह देण्यात आले आहे . राष्ट्रवादी च्या सर्व उमेदवारांना कपबशी च्या चिन्हांवर निवडणुक लढवावी लागणार आहे . जावलीतील राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांना चालण्याची काठी तर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना विमान व कराडमध्ये काँग्रेसचे उमेदवार उदयसिंह पाटील यांना किटली हे चिन्ह मिळाले आहे . कोरेगाव मध्ये सुनील खत्री यांना विमान तर खटावमध्ये राष्टवादी चे बंडखोर उमेदवार प्रभाकर घार्गे यांना ट्रॅक्टर हे चिन्ह मिळाले आहे . माणमध्ये शेखर गोरे यांना टेबल तर महिला राखीव गटात शारदा कदम यांना पतंग तर चंद्रभागा काटकर यांना शिलाई मशीन चिन्ह प्रदान झाले आहे . नागरी बँक मतदार संघात सुनिल जाधव यांना हॅटचे चिन्ह मिळाले आहे.