दैनिक स्थैर्य । दि. २४ ऑगस्ट २०२२ । मुंबई । अकोला येथील विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन केले जाईल. त्यासाठी निधीची तरतूद केली जाईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्य रणधीर सावरकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, अकोला विमानतळ विस्तारीकरणाबाबत राज्य शासन आवश्यक असणारी कार्यवाही करण्यास सकारात्मक आहे. विमानतळाच्या विकासाबरोबरच उडाण योजनेत समावेश करावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी सांगितले.