दैनिक स्थैर्य । दि. १९ जुलै २०२२ । बारामती । बारामती तालुक्यातील ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मिडीयम आणि ज्यु. कॉलेज सावळ मध्ये विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी असते व मोठी माणसे मतदान कसे करतात ? ईव्हीएम मशीन कशी असते ? मतमोजणी कशी करतात ? शाई का लावतात ? आणि एकूण प्रक्रिया कशी असते ? असे अनेक प्रश्न विद्यार्थी शाळेतील शिक्षकांना सतत विचारत असतात.याच प्रश्नाचे उत्तर म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांना दोन गटांत विभागात निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्षात राबविण्याचा निर्णय घेतला.
पाचवी ते दहावी पर्यंतसाठी प्रत्येक वर्गासाठीची विविध पदे सांगून वर्गस्तरची निवडणूक हात वर करून घेण्यात आली. यात शिक्षण, परिपाठ, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, माहिती तंत्रज्ञान, क्रीडा, अशी पदे निवडली गेली. सोबतच त्यांची कामे सांगून जबाबदारी देण्यात आली आणि शाळेच्या मुलांचे प्रतिनिधी व मुलींचे प्रतिनिधी या पदासाठी निवडणूक घ्यायची तयारी केली. या पदासाठी 16 विद्यार्थी उमेदवार इच्छुक होते.मुलींमधून सायली सिंगटे, जान्हवी गुळवे, अस्मिता लोणकर, वैष्णवी शिंदे, संस्कृती कुटे, तनुजा आटोळे, प्रांजली पवार, श्रावणी पवार तर मुलामधून साहिल पवार, अभिजीत वाघाडकर, स्वयम कुंभार, आर्यन वरे, विनय आटोळे, प्रणव भरणे, नंदलाल तिवारी, दिग्विजय तिवाटणे या विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. व त्यांना एक दिवस प्रचार करण्यासाठी वेळ दिला.
वोटिंग मशीन ऍपद्वारे ईव्हीएम तयार करत त्यात फोटोसह उमेदवार यादी तयार करून घेतली. शाळेतील 350 विद्यार्थ्यांनी मतदानात भाग घेतला. मतदान केंद्राबाहेर मोठी रांग लावून दरवाज्याजवळ एका विद्यार्थ्यांस पोलीस बनवले आणि रांगेवर नियंत्रण ठेवण्यास सांगितले. सुहास चव्हाण यांनी मार्कर पेनने बोटावर शाई लावली. योगेश तांबे यांनी मतदान बूथ युनिट सांभाळले. विद्यार्थी खूप उत्सुकतेने या प्रक्रियेत सहभागी झाले.
4 दिवसांच्या मतमोजणी नंतर निकाल जाहीर करण्यात आला. यात साहिल पवार (9 वी) याला सर्वाधिक 95 मते मिळाली आणि मुलांचा प्रतिनिधी म्हणून निवड जाहीर केली व संस्कृती कुटे (8 वी )हिला मुलींमध्ये सर्वाधिक 83 मते मिळाली व तिची मुलींची प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.निवडीनंतर सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला व गुलाल लावून आनंद साजरा केला. शेवटी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सत्कार डीवायएसपी इंगळे साहेब यांच्या हस्ते नावाचे बॅच व पट्टी, देऊन करण्यात आला. यावेळी ज्ञानसागर गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर आटोळे , उपाध्यक्षा रेश्मा गावडे,सचिव मानसिंग आटोळे, दिपक सांगळे, दिपक बिबे, सीईओ संपत जायपत्रे, विभागप्रमुख गोरख वणवे, प्राचार्य दत्तात्रय शिंदे, निलीमा देवकाते, स्वप्नाली दिवेकर,राधा नाळे, यांचेसह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.