दैनिक स्थैर्य । दि. ०७ डिसेंबर २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील गुणवरे येथील ब्लूम इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये निर्भया पोलीस पथकाच्या वतीने विद्यार्थी व विद्यार्थिनींना कायद्याविषयी सुलभ भाषेमध्ये माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस काका, पोलीस दीदी या योजनेअंतर्गत मुलांना माहिती देण्यात आली. १००, १०९१, १०० दयाळ ११२ याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. समाजामध्ये वावरत असताना निर्भया पोलीस पथकाचा विद्यार्थी व विद्यार्थिनींना नक्कीच फायदा होईल, असा विश्वास प्राचार्य गिरीधर गावडे यांनी व्यक्त केला.
फलटण तालुक्यातील गुणवरे येथील ब्लूम इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये निर्भया पोलीस पथकाच्या वतीने विद्यार्थी व विद्यार्थिनींना कायद्याविषयी सुलभ भाषेमध्ये माहिती देण्यात आली. पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल वैभवी प्रमोद भोसले, महिला पोलीस कॉन्स्टेबल संध्या वलेकर, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय भिसे, पोलीस हेडकॉन्स्टेबल मल्हारी भिसे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या उपक्रमास संस्थेच्या सचिव सौ. साधना गावडे व अध्यक्ष ईश्वर गावडे यांनी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमास चांगला प्रतिसाद दिला. प्राचार्य गिरीधर गावडे यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश सस्ते यांनी केले.