दैनिक स्थैर्य | दि. २६ सप्टेंबर २०२३ | फलटण |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित, कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषीकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ कार्यक्रमांतर्गत ठिबक सिंचन तसेच त्याचे भाग व फायदे याविषयी सविस्तर माहिती दिली. हे प्रात्यक्षिक प्रगतशील शेतकरी सदाशिव कदम यांच्या शेतावर घेण्यात आले. यावेळी गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे, कार्यक्रमाधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे व प्रा. नितिशा पंडित व प्रा. धायगुडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या समृद्धी मोहिते, प्राजक्ता ननावरे, पूजा मारवाडी, शिवांजली धुमाळ, समृद्धी कुंजीर, समृद्धी उल्हारे, साक्षी शिंदे, हर्षदा लोखंडे यांनी उत्कृष्ट अशा पद्धतीने ठिबक सिंचनविषयी माहिती दिली.