पिंपरद येथे कृषीकन्यांनी दिली बोर्डोक्स मिक्श्चरविषयी माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २५ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, कृषी महाविद्यालय फलटणच्या सातव्या सत्रातील विद्यार्थिनींनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ कार्यक्रमांतर्गत पिकावरील वाढत्या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी बोर्डोक्स मिक्श्चरचे प्रात्यक्षिक कृषी कन्यांमार्फत करून दाखवण्यात आले. यावेळी पिंपरद गावच्या सरपंच सौ. स्वाती भगत व गावातील शेतकर्‍यांनी कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली.

या कार्यक्रमासाठी २० शेतकरी उपस्थित होते. यावेळी कृषीकन्यांनी द्राक्ष या फळ पिकावर दावण्या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी बोर्डोक्स मिक्श्चर तयार करून त्याचा वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

बोर्डोक्स मिक्श्चर हे वेगवेगळ्या प्रकारचे रोगनियंत्रण करण्यासाठी वापरले जाते आणि बोर्डोक्स मिक्श्चर बनवण्यासाठी आणि त्याचा वापर करण्यासाठी खूप सोपे आहे. तसेच ते खूप खर्चिकही नसते. बोर्डोक्स मिक्श्चर हे लिंबू व इतर फळबागांसाठी खूप फायदेशीर आहे.

कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, नितिशा पंडित मॅडम आणि प्रा .पी. व्ही. भोसले सर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली कृषीकन्या कुमारी प्रतीक्षा जगताप, अक्षदा जाधव, प्रणिता गोडसे, निशिगंधा खुडे, आरती जाधव, समृद्धी जगताप, आर्या जाधव यांनी हे प्रात्यक्षिक यशस्वीरिता पार पाडले.


Back to top button
Don`t copy text!