धुळदेव येथे कृषिकन्यांनी दिले शेतमाल विक्रीच्या अ‍ॅप्लिकेशनची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २५ जानेवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२०२४ कार्यक्रमाअंतर्गत कृषीविषयक शेतमालाचे विक्रीचे अ‍ॅप्लिकेशन याच्या माहितीसंबंधी प्रात्यक्षिक हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडला.

कृषीकन्या सिद्धी शेटे, साक्षी जाधव, समृद्धी जगताप, सिद्धिका कांबळे, स्वेजल पाटील, प्रियांका शिंदे, प्रियांका भोसले व श्वेता सस्ते यांनी मोबाईलमधील शेतीविषयक विविध एप्लिकेशन्स जसे की इफ्फको किसान, मंडी सेंट्रल, मार्केट यार्ड, एचडीएफसी इरगो, कृषीफाय इत्यादींची ओळख शेतकर्‍यांना मोबाईलद्वारे करून दिली. या अ‍ॅप्लिकेशनद्वारे होणारे फायदे जसे की चालू बाजारभाव, हवामान अंदाज, पूरक बियाणे, कीटकनाशके व खते यांच्या चालू बाजारभावाची माहिती, शेतमालाचे खरेदी विक्रीचे स्थानिक व आंतरराष्ट्रीय भाव यांची माहिती इत्यादी शेतकर्‍यांना पटवून दिले. तसेच प्रगतशील शेती व हे अ‍ॅप्लिकेशन शेतकर्‍याला शेतीचे अर्थनियोजन योग्य पद्धतीने करण्यासाठी कसे मदत करतात, याविषयी माहिती दिली.

कृषीकन्यांंनी हे अ‍ॅप्लिकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यापासून ते त्याचा प्रत्यक्ष उपयोग कसा करावा, याची सविस्तर माहिती शेतकर्‍यांना दिली.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वय प्रा. नीलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.


Back to top button
Don`t copy text!