खाजगी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या धर्मादाय खाटांची माहिती नियमितपणे लोकांना द्या – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.९ मे २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यात  घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रकल्प करण्यासाठी पुढाकार घ्यावा. घनकचरा, वैद्यकीय कचरा, पाणीटंचाई, नागरी वने यासाठी निधी मिळू शकतो यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा. वन विभाग काही नागरी सुधारणा करू शकतो. महत्त्वाच्या ठिकाणी औषधी वनस्पती लागवड व इतर सर्व पक्षीय लोक प्रतिनिधींच्या सूचना घेऊन कार्यवाही करावी. एकल महिलांना पायावर उभे करण्यासाठी शेतीविषयक प्रकल्प सुरू करावेत. शाश्वत विकास उद्दिष्ट गाठण्यासाठी आरोग्य, जलसंवर्धन, सौरऊर्जा या विषयात काम करण्यासाठीच्या प्रक्रिया सुरू व्हाव्यात, असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती  डॉ नीलम गोऱ्हे यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत केले.

या बैठकीत आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन, महिला बाल विकास, परिवहन, अन्न व औषध प्रशासन, नगर परिषद अशा विविध विभागांच्या कामाचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी आमदार महेश शिंदे, प्र. जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, उपजिल्हाधिकारी संगिता चौगुले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकृष्ण पवार, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी सपना घोळवे, जिल्हा नियोजन अधिकारी  शशिकांत माळी, महाबळेश्वरच्या तहसिलदार सुषमा पाटील, वाईचे तहसिलदार रणजीत भोसले आदी अधिकारी उपस्थित होते.

ज्या रुग्णालयांना शासकीय जमीन दिली आहे तिथे कोणकोणत्या योजना आहेत, किती खाटा आहेत याचे बोर्ड लावले आहेत, याची माहिती द्या. धर्मादाय आयुक्तांकडे ही माहिती असली तरी लोकांना माहिती होण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात आणि तालुका जिल्हा पातळीवर ही माहिती लोकांना माहितीसाठी द्यावी, स्वयंसेवी संस्थांनी आपल्या माध्यमातून ही माहिती उपलब्ध करून द्यावी असे निर्देश यावेळी उपसभापती यांनी दिले. यावेळी मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयांच्या ऑडिटसाठी ऑडिटर नेमले होते. त्यांचा अहवाल अद्याप पूर्ण झालेला नाही. रुग्णांच्या तक्रारीबाबत तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली होती. त्या माध्यमातून निराकरण करण्यात आले. खाजगी रुग्णालयातील रुग्णांच्या तक्रारींची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यात यावीत. कोविड काळात शाळांतील मुलींची संख्या कमी झाली आहे. त्याबाबत प्रशासनाने पालकांशी संवाद साधून शाळेत मुलींची संख्या वाढविण्याचा प्रयत्न करावा. दुर्गम भागातील गावांतील नागरिकांना शासन नियमानुसार आगाऊ धान्य पुरवठा करावा. तसेच शेतकऱ्यांना मोफत खते व बियाणे वाटप करण्याबाबत नियोजन करावे. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना शासकीय मदतीचे वाटप करावे. कोविड काळात मृत्यू झालेल्या एकल महिलांना दुकान गाळे, रिक्षांचे परमीट इ. विविध योजनांचा लाभ द्यावा. विविध महामंडळांकडून प्राप्त होणाऱ्या निधीतून अशा महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन द्यावे. तसेच शेतकरी एकल महिलांना मोफत बियाणे वाटप करण्याच्या सूचनाही केल्या.

कोरोना काळानंतर  जिल्ह्यात शाळेत जाणाऱ्या मुलींची संख्या काय आहे, त्यावर काय परिणाम झाला याबाबत जिल्हा परिषद आणि नगरपालिका यांनी माहिती घ्यावी. समाजकल्याण, भटके विमुक्त, डोंगरी भागातील शाळा याबाबत प्राधान्याने लक्ष द्यावे याकडे लक्ष वेधले.

डॉ. गोऱ्हे यांनी 19 एप्रिल रोजी पुणे विभागीय आयुक्तांकडे घेतलेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार सातारा जिल्ह्यातही बाजार गावात लसीकरण शिबिरे घेतली आहेत. रुग्णवाहिका चालकांची संख्या पुरेशी आहेत याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

अनेकदा अडचणीच्या वेळी ग्रामीण भागात रुग्णवाहिका उपलब्ध होत नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलांची विशेष काळजी घ्यावी. जिल्हा परिषद आणि शाळा या माध्यमातून हे काम व्हावे. पारधी समाजाच्या मुलांना आधार कार्ड आणि बाकी गरजेची प्रमाणपत्र देण्यासाठी शाळांना सूचना द्याव्यात अशा प्रकारच्या समस्या माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा  चेतना सिन्हा – गाला यांनी मांडल्या.

एकल शेतकरी महिलांना जिल्हा प्रशासन आणि माणदेशी फाऊंडेशन यांच्या वतीने मोफत बियाणे देण्यात येणार आहे. या महिलांना आवश्यक ती प्रशिक्षणे आणि मदत माणदेशी फाऊंडेशन करील,असे त्या म्हणाल्या.

स्थानिक अधिकाऱ्यांची मदत घेऊन यावर शिबिरांच्या माध्यमातून मार्ग काढावा. अधिक अडचणी असल्यास उपसभापती कार्यालयाचे मार्गदर्शन घेण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे  बैठक घ्या असे निर्देश आज डॉ गोऱ्हे यांनी दिले.

डॉ. गोऱ्हे यांनी दिलेले काही प्रमुख विषय आणि निर्देश पुढील प्रमाणे

१. महिलांना शेतकरी उताऱ्यावर नावे लावण्यासाठी महसूल यंत्रणेला सूचना दिल्या आहेत.  लोकशाही दिनाच्या निमित्ताने सर्वांना याबाबत मदत करा.

२. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खते बियाणे वाटप हे बांधावर जाऊन केले. 1366 गटांनी भाजीपाला विक्री केली.

३. महिला बाल विकास – 974 बालकांनी पालक गमावले. पंतप्रधान केअर योजनेत 25 मुलांना 10 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. ही रक्कम पोस्टाच्या संयुक्त खात्यात जमा झाली आहे. राज्य शासनाकडून 5 लाख रुपयांचा निधी या 25 मुलांना मिळाला. दरमहा 1100 रुपयांचा निधी या 739 मुलांना मिळाला आहे. 650 मुलांना 56 लाख 62 हजार रुपये वाटप करण्यात आले आहेत.

शासन सेवेत 1 टक्के आरक्षण साठी अनाथ प्रमाणपत्र वाटप केले आहेत. देहविक्री करणाऱ्या स्त्रियांना धान्य वितरण केले आणि प्रति व्यक्ती 5000 रुपयांचा निधी दिला.

सातारा जिल्ह्यात 2902 महिलांना वैधव्य आले. त्यात 849 महीला एकल पालक आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा स्तरावर संजय गांधी, श्रावण बाळ, इंदिरा गांधी निवृत्ती वेतन,राष्ट्रीय कुटुंब लाभ, अंत्योदय, घरकुल अशा विविध योजनांचा लाभ देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ३६१ महिलांना विविध प्रकारची प्रशिक्षणे देण्यात आली आहेत.

४. नगरपालिका क्षेत्रातील महिलांवर लक्ष केंद्रित करावे. जर त्यांच्या पतीच्या मालकीची दुकाने, रिक्षा, मालमत्ता, घरे, पशुधन, गाळे यांचे त्यांच्या नावावर हस्तांतरण करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. पावसाळ्यापूर्वी याचा अहवाल सादर करावा. राज्य विधी सेवा प्राधिकरण मदत करीत आहे.

५. राज्य सरकारचे ५० हजार अनुदान ६७५० पैकी ६५०० मंजूर करून ६००० नागरिकांना ३० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. याबद्दल डॉ गोऱ्हे यांनी अभिनंदन केले आहे.

६. महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे महामंडळ, मौलाना आझाद महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ हे या महिलांना व्यवसायासाठी मदत करायला तयार आहे.

७. महिला बाल विकास, समाज कल्याण यांनी याबाबत पुढाकार घ्यावा असे त्यांनी यावेळी सांगितले. महानगरपालिका क्षेत्रात ज्यांनी शक्य आहे, त्यांनी या एकल महिलांना अनुदान दिले.

८. कृषी विभागाच्या वतीने महिलांना त्यांच्या शेतमालाचे मार्केटिंगसाठी मदत आणि तीन एकर पर्यंत मोफत बियाणे खते उपलब्ध करून दिली जावीत. त्या माध्यमातून महिला त्यांची शेती जतन करू शकतील. या महिलांना योग्य ती मदत देणे हे शासनाचे काम आहे. १० जून पर्यंत याबाबत नियोजन करावे. महाबळेश्वर सारख्या ठिकाणीही लक्ष द्यावे.

९. एकल महिलांच्या ११ ते १८ वयोगटातील मुलींचे कौटुंबिक तणावामुळे बालविवाह होऊ शकतात. यावर नजर ठेवून या महिलांना आवश्यक मदत केली पाहिजे. पोलिस आणि स्वयंसेवी संस्थांनी याबाबत पुढाकार घ्यावा.

१०. शेतकरी महिलांना योग्य ती मदत देता येईल असे कृषी विभागाच्या काळे यांनी सांगितले. यावर अहवाल सादर करण्याचे निर्देश डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

११. श्रम मंत्रालयाच्या कामावर लक्ष केंद्रित होणे आवश्यक असल्याचे यावेळी नितीन बानगुडे पाटील यांनी सांगितले. यावर ११ लाख २८१२ उद्दिष्ट होते…  ३,१०,००० पूर्ण झाले आहे. सामाजिक सुरक्षा योजनाचे लाभ विविध लोकांपर्यंत पोचावे अशी अपेक्षा व्यक्त केली. भाजी विक्रेते, परिचर, ऊसतोड कामगार, घरेलु कामगार यांच्यासाठी दिनांक १७ ते ३० मे पर्यंत मोहीम जिल्ह्यात घ्या अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली.

१२. सातारा जिल्ह्यात ७४३ सी एस सी सेंटर्स मध्ये काम करत आहोत. यासाठी आम्ही संयुक्त मोहीम घेऊन प्रचार प्रसिध्दी करू असे सांगितले. यावर एक वेगळी बैठक नितीन बानगुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावी.

१३. गावांचे पुनर्वसन कार्याचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. जावळी, पाटण, सातारा वाई तालुक्यातील १४ गावे आणि ८ कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. दरड प्रवण गावातील प्रशिक्षण प्रचार प्रसार १२४ गावात दिले आहे. या गावांना मोबाईल द्वारे सूचना देण्यासाठी कोल्हापूर येथील यंत्रणा निमंत्रित केली आहे. विभागाने  Satelaait यंत्रणा प्रस्तावित केली आहे. कम्युनिटी रेडिओ सेंटर्स सुरू करण्याबाबत विचार व्हावा.

१४. आपत्ती प्रवण ठिकाणी धोक्याचा इशारा देण्यासाठी सायरनचा वापर करीत आहोत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संवेदनशील ठिकाणी बांधकामे होऊ न देणे, शेतीवर काही प्रमाणात बंधने आली आहेत.

१५. राज्य सरकारच्या या चारही जिल्ह्यांचा अहवाल घेऊन त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन विषयांची जिल्हास्तरीय कार्यवाही करण्याची सूचना आणि नियोजन उद्या जिल्हाधिकारी स्तरावर होणाऱ्या बैठकीत यावेळी डॉ गोऱ्हे यांनी केली. या विषयावर येत्या १७ तारखेला आढावा बैठक घेणार असल्याचे जाहीर केले.

१६. शिवछत्रपती वस्तू संग्रहालय तात्पुरते कोविड सेंटर पुन्हा संग्रहालयात करण्याबाबत विचार व्हावा अशी सूचना नितीन बानगुडे पाटील यांनी केली. त्यावर सकारात्मक विचार व्हावा अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली. सातारा जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि नितीन बानगुडे पाटील यांनी एकत्र पाहणी करावी अशी सूचना केली.

१७. राष्ट्रीय महामार्ग येथील पुल दुरुस्ती आणि धरणांची दुरुस्ती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.


Back to top button
Don`t copy text!