कराड येथील बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू


उपचारादरम्यान महिलेचा मृत्यु, संशयित म्हणून नमुना पाठविला तपासणीला

स्थैर्य, सातारा दि. 29 : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे शनिवार पेठ, कराड येथील 75 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान आज  सकाळी मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

तसेच काल रात्री मलकापूर ता. कराड येथून क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे सारी आजारामुळे दाखल झालेल्या 85 वर्षीय महिलेचाही उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. कोविड संशियत म्हणून या महिलेचा नमुना उपचारादरम्यान घेतला असून तो पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!