
दैनिक स्थैर्य । दि. २६ जुलै २०२२ । सातारा । औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातारा येथे शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत ऑगस्ट 2022 प्रवेश सत्रासाठी प्रवेश प्रक्रियेला ऑनलाईन पद्धतीने सुरुवात झालेली आहे, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी कळविले आहे.
10 वी चा निकाल जाहीर होताच आयटीआय प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जाते. www.itiadmission.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशासंबंधी सर्वकष माहिती उपलब्ध आहे. प्रवेशाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे.
हरकती नोंदविणे 26 जुलै, अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे 28 जुलै, पहिली प्रवेश फेरी 30 जुलै ते 3 ऑगस्ट 2022, दुसरी प्रवेश फेरी 8 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट, तिसरी प्रवेश फेरी 17 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट व चौथी प्रवेश फेरी 24 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट 2022.
नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे (फक्त संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी) समुपदेशन फेरी नोंदणी करणे 30 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट, समुपदेशन फेरी जागा वाटप 2 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर 2022
 
					 
					 
					 
					
 
					 
					 
					 
					 
					 
					