मलकापूरच्या सराईत गुन्हेगाराकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.१३ एप्रिल २०२२ । सातारा । मलकापूर तालुका सातारा येथील रेकॉर्डवरील असलेल्या गुन्हेगारांकडून स्थानिक गुन्हे शाखेने देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काढतोच असा एकूण 65 हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी कराड शहरातील भाजी मंडई परिसरात ही कारवाई केली.

यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मलकापूर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार गौरव सुरेश बनसोडे वय 22 रा. मलकापूर हा कराड शहरातील भाजी मंडई परिसरामध्ये येणार असल्याची माहिती मिळाली होती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुमाळ यांच्या निर्देशानुसार कराड शहर भाजी मंडई परिसरात सापळा लावला.
मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान प्राप्त माहितीनुसार वर्णन केलेला इसम आढळून आल्यानंतर पोलिसांनी बनसोडे याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. पोलिसांच्या झडतीमध्ये त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतुस असा 65 हजारांचा मुद्देमाल आढळून आला. त्याच्याविरुद्ध कराड शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संबंधित गुन्हेगाराच्या विरोधात कराड पोलिस ठाण्यांमध्ये कलम 896 324 आणि 307 प्रमाणे गुन्ह्यांची नोंद आहे.

पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांनी या कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे अभिनंदन केले आहे. या कारवाईमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, मदन फाळके उपनिरीक्षक युसी दबडे, तानाजी माने, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष पवार, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, अमोल माने, स्वप्निल माने, मुनीर मुल्ला, अजित कर्णे, शिवाजी भिसे, दिपाली यादव, यशोमती साळुंखे, पृथ्वीराज जाधव, मयूर देशमुख, मोसिन मोमीन, रोहित निकम, प्रवीण पवार, संकेत निकम, गणेश कचरे, संभाजी साळुंखे, सुशांत घाडगे यांनी सहभाग घेतला.


Back to top button
Don`t copy text!