दैनिक स्थैर्य । दि. २२ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा तालुक्यातील माळ्याचीवाडी येथे देेशी दारुच्या २३ बाटल्या जप्त केल्या असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
रमेश दिनकर दुदुस्कर (वय ३३, रा. सोनगांव, ता. जावळी, जि. सातारा. सध्या रा. माळ्याचीवाडी, ता. सातारा) आणि तुषार शंकर कापसे (रा. माळ्याच्यावाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, माळ्याचीवाडी ते आकले कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या शंकर विठोबा कापसे यांच्या शेतामधील जनावराच्या शेडच्या आडोशाहून पोलिसांनी अठराशे रुपये किंमतीच्या देशी दारुच्या २३ बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी रमेश दुदुस्कर आणि तुषार कापसे या दोघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. सातारा तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत.