
स्थैर्य, चेन्नई, दि.१३: पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 6 गडी गमावून 300 धावा केल्या आहेत. ऋषभ पंत 33 आणि अक्षर पटेल 5 धावांवर नाबाद आहेत. रविचंद्रन अश्विन 13 धावांवर बाद झाला. अश्विनला जो रूटने ऑली पोपच्या हाती झेलबाद केले. अजिंक्य रहाणे 67 धावा करून बाद झाला. त्याला मोईन अलीने त्रिफळाचीत केले.
रहाणेने कसोटी कारकिर्दीतील 23 वे अर्धशतक केले. तर रोहित शर्मा 161 धावांवर बाद झाला. रोहितला जॅक लीचने मोईन अलीच्या हाही झेलबाद केले. रोहित आणि रहाणेने चौथ्या विकेटसाठी 162 धावांची भागीदारी केली. इंग्लडसाठी लीच आणि मोइन अलीने 2-2 गडी बाद केले. तर ऑली स्टोन आणि रूटला 1-1 विकट मिळाली.
रोहितने कसोटी कारकिर्दीतीले 7 वे शतक केले. त्याने 130 चेंडून शतक पूर्ण केले. रोहितने 15 महिन्यानंतर कसोटी सामन्यात शतक झळकावले आहे. त्याने मागील शतक ऑक्टोबर 2019 मध्ये रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केले होते. रोहितने सातही शतकं भारतात केली आहेत. चेन्नईत हे त्याचे पहिले शतक आहे.
रोहित-रहाणेची 162 धावांची भागीदारी
तीन गडी गमावल्यानंतर रोहित आणि रहाणे भारताचा डाव सांभाळला. यादरम्यान रोहितने कसोटी कारकिर्दीतील 7 वे शतक ठोकले. त्याने 130 चेंडूत हे शतक पूर्ण केले. त्याने मागील शतक ऑक्टोबर 2019 मध्ये रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केले होते. रोहितने सातही शतकं भारतात केली आहेत. चेन्नईत हे त्याचे पहिले शतक आहे.
रोहितने चौथ्यांदा कसोटीत 150+ धावा केल्या. याआधी त्याने वेस्टइंडीज विरुद्ध 2013 मध्ये एकदा (177 धावा) आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2019 मध्ये दोनदा (176 आणि 212 धावा) ही कामगिरी केली होती. तर रहाणेनेदेखील कसोटीतील 23 वे अर्धशतक केले. अजिंक्य आणि रोहित दोघांनी चौथ्या विकेटसाठी 162 धावांची भागीदारी केली.
रोहित आणि पुजाराची 85 धावांची भागीदारी
भारताची सुरुवात खराब राहिली. भारताने दुसऱ्याच षटकात शून्यावर पहिला गडी गमावला. सलामीवीर शुभमन गिल भोपळा न फोडतात तंबूत परतला. वेगवाग गोलंदाज ऑली स्टोनने त्याला पायचीत केले. यानंतर पुजारा 21 धावा काढून बाद झाला. जॅक लीचने त्याला बेन स्टोक्सच्या हाती झेलबाद केले. रोहित आणि पुजाराने दुसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली. यादरम्यान रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 12 वे अर्धशतक पूर्ण केले. भारताने सलग दोन षटकांत 2 गडी गमावले. 21 व्या षटकात पुजारा आणि 22 व्या षटकात कोहली बाद झाला.
कोहली 11 व्यांदा शून्यावर बाद झाला
कर्णधार विराट कोहलीला पहिल्यांदाच फिरकीपटूने शून्यावर बाद केले. मोइन अलीने त्याला त्रिफळाचीत केले. आतापर्यंत कोहली एकूण 11 वेळा शून्यावर बाद झाला. तो भारतात सलग दोन डावांत त्रिफळाचीत झाला आहे. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात स्टोक्सने कोहलीला 72 धावांवर त्रिफळाचीत केले होते. कोहलीने भारतात 63 डाव खेळले. यामध्ये तो 4 वेळा बोल्ड झाला आहे.
भारतीय प्लेइंग इलेवनमध्ये 3 बदल
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेवनमध्ये 3 बदल करण्यात आले आहेत. शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर आणि जसप्रीत बुमराहला स्थान देण्यात आले नाही. त्यांच्या जागी अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराजला संधी मिळाली आहे.
दोन्ही संघ
भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी.
इंग्लंड: डॉम सिबली, रोरी बर्न्स, डैन लॉरेंस, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फोक्स, मोइन अली, जैक लीच, स्टुअर्ट ब्रॉड आणि क्रिस वोक्स.
कोरोना काळात पहिल्यांदाच 50% प्रेक्षकांना मैदानात एंट्री मिळाली आहे. स्टेडियमच्या सर्व 17 गेटमधून एंट्री करता येईल. यादरम्यान, सर्वांचे तापमान चेक केले जाणार. याशिवाय, स्टेडियममध्ये मेडिकल आणि आयसोलेशन रुम बनवण्यात आली आहे.
प्रेक्षकांवर CCTV ची नजर
तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे सचिव रामासैमी यांनी सांगितले की, प्रत्येक दोन व्यक्तींमध्ये एक सीट रिकामे ठेवले जाईल. याशिवाय, सोशल डिस्टेंसिगवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व स्टेडियममध्ये CCTV कॅमेरे लावण्यात आले आहेत. प्रेक्षक स्टेडियममध्ये फक्त मोबाइल घेऊन जाऊ शकतील. स्टँड्समध्ये बॉल गेल्यावर अंपायर बॉलला सॅनिटाइज करेल.
पवेलियनमध्ये प्रेक्षकांना एंट्री नाही
रामासैमी पुढे म्हणाले की, ‘स्टेडियमची क्षमता 32 हजार प्रेक्षकांची आहे, पण फक्त 14 हजार प्रेक्षकांना एंट्री मिळेल. पवेलियन साइडला रिकामे ठेवले जाईल, कारण तिथे खेळाडून बसतात. बायो-बबलमुळे पवेलियनला रिकामे ठेवले जाईल. येथे फक्त अधिकारी आणि स्टाफसह 600 लोक उपस्थित असतील.’