भारतातील पहिले 5G वायरलेस Wi-Fi लाँच, एकाचवेळी 64 डिव्हाईसवर चालणार इंटरनेट!

देशात फायबर वाय-फायची सुविधा नाही अशा ठिकाणी इंटरनेट सेवा देण्यासाठी एअरटेलचे डिव्हाईस मदत करेल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ ऑगस्ट २०२३ । मुंबई । भारती एअरटेलने सोमवारी फिक्स्ड वायरलेस एक्सेस (FWA) डिव्हाईस Airtel Xstream AirFiber लाँच केले. हे भारतातील पहिले 5G वायरलेस वाय-फाय डिव्हाईस आहे. देशात फायबर वाय-फायची सुविधा नाही अशा ठिकाणी इंटरनेट सेवा देण्यासाठी एअरटेलचे डिव्हाईस मदत करेल. कंपनीने सांगितले की, डिव्हाईस हे भारतातील ग्रामीण आणि शहरी भागात कनेक्टिव्हिटी प्रदान करेल, जेथे फायबर पायाभूत सुविधा निर्माण करणे एक आव्हान आहे.

फायबरच्या मदतीने घर-ऑफिसमध्ये वाय-फायच्या माध्यमातून चांगली इंटरनेट सेवा मिळते. दरम्यान, जिथे फायबर लाइन टाकण्यात आलेली नाही, तेथे जलद इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळणे कठीण होते. एअरटेल एक्स्ट्रीम एअरफायबर उपकरणाच्या मदतीने तुम्ही जलद इंटरनेटच्या सुविधेचा लाभ घेऊ शकता. तसेच, एअरटेलच्या विशेष सेवेने फायबर आणि नॉन-फायबर क्षेत्रांमधील अंतर कमी केले आहे.

देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपनीने आज एक्स्ट्रीम एअरफायबर सादर केले आहे. सध्या ही सेवा फक्त दिल्ली आणि मुंबई या दोन शहरांसाठी सुरू करण्यात आली आहे. यानंतर कंपनी देशभरातील अधिकाधिक शहरांमध्ये एक्स्ट्रीम एअरफायबर कनेक्टिव्हिटी सुरू करेल. एअरटेलने सांगितले की, ‘मेक इन इंडिया मिशन’ अंतर्गत सर्व एक्स्ट्रीम एअरफायबर डिव्हाईस भारतात बनवले जातील.

काय आहे एक्स्ट्रीम एअरफायबर?
एक्स्ट्रीम एअरफायबर हे इन-बिल्ट Wi-Fi 6 टेक्नॉलॉजीने सुसज्ज असलेले एक प्लग-अँड-प्ले डिव्हाईस आहे. एअरटेलचे लेटेस्ट वाय-फाय डिव्हाइस एका वेळी 64 पर्यंत डिव्हाइस कनेक्ट करू शकते आणि इंटरनेट चालवू शकते.

या ठिकाणी खरेदी करू शकता
एक्स्ट्रीम एअरफायबर फक्त दिल्ली आणि मुंबईसाठी लाँच करण्यात आले आहे. तुम्ही ते दोन्ही शहरांतील निवडक एअरटेल स्टोअरमधून खरेदी करू शकता. हे डिव्हाईस खरेदी केल्यानंतर फोनमध्ये एक्स्ट्रीम एअरफायबर अॅप डाउनलोड करावे लागेल. डिव्हाईस सेटअप फक्त येथून होईल. यानंतर, ग्राहक फोनवरील QR कोड स्कॅन करून किंवा पासवर्ड टाकून वाय-फायशी कनेक्ट होऊ शकतात आणि इंटरनेटचा पुरेपूर आनंद घेऊ शकतात.

काय आहे किंमत?
एक्स्ट्रीम एअरफायबर 799 रुपये प्रति महिना प्लॅनसह उपलब्ध आहे. हे तुम्हाला 100 Mbps चा इंटरनेट स्पीड देते. हा प्लॅन तुम्ही 2,500 सिक्युरिटी डिपॉझिटसह (वन-टाइन रिफंडेबल) 4,435 रुपयांत सहा महिन्यांसाठी देखील निवडू शकता. मात्र, 18 टक्के जीएसटी लागू केल्यानंतर, या प्लॅनची ​​किंमत 7,733 रुपये असणार आहे.


Back to top button
Don`t copy text!