
दैनिक स्थैर्य । 11 एप्रिल 2025 । पुणे । २०२४ मध्ये स्थापन झालेल्या सर्किट हाऊस टेक्नॉलॉजीजने आपला नवीन ब्रँड लुमिओसह भारतातील सर्वात वेगवान स्मार्ट टीव्ही लॉन्च करत स्मार्ट टीव्ही बाजारात खळबळ उडवून दिली आहे. ल्युमिओने भारतातील ५ अब्ज डॉलर्सच्या स्मार्ट टीव्ही बाजारपेठेतील स्लो टीव्हीची समस्या दूर करण्यासाठी आज भारतीय बाजारात ल्युमिओ व्हिजन ९ आणि ल्युमिओ व्हिजन ७ हे दोन प्रीमियम स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. ल्युमिओ व्हिजन ९ हा एक क्यूडी-मिनी एलईडी टीव्ही आहे तर व्हिजन ७ हा क्यूएलईडी पॉवरहाऊस आहे. हे दोन्ही टीव्ही जलद गती, रंगीत आणि अचूक डिस्प्लेसह घरी थिएटरसारखा अनुभव देतात.
सर्किट हाऊस टेक्नॉलॉजीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघु रेड्डी म्हणाले, ”आम्ही सर्वांसाठी स्लो टीव्हीची समस्या दूर करण्यासाठी भारतात वेगवान स्मार्ट टीव्ही डिझाइन केले आहेत. आम्ही ल्युमिओ व्हिजन ९ आणि व्हिजन ७ सिरीजसह आम्ही गतीशील स्पीड, दर्जात्मक पिक्चर व साऊंड देत आहोत, ज्यामधून भारतातील ग्राहकांना आनंदमय मनोरंजनाचा अनुभव मिळेल.”
ल्युमिओने लॉन्च केलेले स्मार्ट टीव्ही व्हिजन ९ आणि व्हिजन ७ हे उत्तम तंत्रज्ञान आणि परवडणाऱ्या किमतीचे उत्तम मिश्रण आहेत. दोन्ही टीव्हीमध्ये फ्लॅगशिप बॉस प्रोसेसर, ३ जीबी डीडीआर४ रॅम आणि डीओपीई डिस्प्ले आहे, ज्यामुळे रंग अतिशय अचूक दिसतात. प्रीमियम क्यूएलईडी तंत्रज्ञान आणि १००% पेक्षा जास्त रंगीत कव्हरेजसह, हे टीव्ही तुम्हाला एक अद्भुत आणि वास्तववादी अनुभव देतील.
ल्युमिओ व्हिजन ७ आणि व्हिजन ९ दोन्हीमध्ये डॉल्बी व्हिजन®, डॉल्बी अॅटमॉस, डीजीएस ऑडिओसह क्वाड स्पीकर सिस्टम आहे, जे १५०% मोठ्या स्पीकर कॅव्हिटीसह इमर्सिव्ह ध्वनी प्रदान करते. दोन्ही सीरीजमध्ये ३ एचडीएमआय पोर्ट (४८जीबीपीएस बँडविड्थ, एक इ-एआरसी), ३ यूएसबी पोर्ट, ऑप्टिकल ऑडिओ आउटपुट आणि हाय-स्पीड वाय-फायसह कनेक्टिव्हिटी उत्तम आहे. तसेच, व्हिजन ७ मध्ये १६ जीबी स्टोरेज आणि व्हिजन ९ मध्ये ३२ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे.
भारतातील स्मार्ट टीव्ही बाजारपेठेत गेल्या आठ वर्षांमध्ये जवळपास ६० दशलक्ष युनिट्सचे शिपिंग दिसण्यात आले आहे. तरीदेखील, मोठी समस्या कायम आहे, ती म्हणजे स्लो व लॅगी इंटरफेसेस. ल्युमिओने केलेल्या संशोधनामधून भारतातील स्मार्ट टीव्ही वापरकर्त्यांसाठी मंद गतीने कार्यसंचालन ही प्रमुख समस्या असल्याचे निदर्शनास येते. लॅगिंग इंटरफेसेसपासून प्रतिसाद न देणाऱ्या रिमोट बटन क्लिक्सपर्यंत लाखो कुटुंबं टेलिव्हिजन्सच्या समस्यांमध्ये अडकलेले आहेत, जे आधुनिक मागण्यांची पूर्तता करण्यास असमर्थ ठरतात. ल्युमिओ यामध्ये बदल करण्यासाठी आले आहे.
ल्युमिओ व्हिजन ९ची वैशिष्ट्ये:
- अद्वितीय कॉन्ट्रास्ट व वैविध्यतेसाठी १९२० ब्ल्यू मिनी-एलईडीसह क्वॉन्टम डॉट एन्हासमेंट लेयर
- कोणत्याही प्रकाशात आश्चर्यकारक स्पष्टतेसाठी ९०० निट्स पर्यंतची कमाल ब्राइटनेस
- कलर गम्यूट कव्हरेज: डीसीआय-पी३ १११ टक्के, आरईसी २०२० ८१ टक्के
- जवळपास परिपूर्ण कलर अॅक्यूरसीसाठी कलर डेल्टा ई १.७१
- प्रीमियम क्वॉलिटी स्मार्ट टीव्हींसाठी वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी ५५ इंच स्क्रिन आकारामध्ये उपलब्ध
ल्युमिओ व्हिजन ७ ची वैशिष्ट्ये:
- कोणत्याही प्रकारच्या प्रकाशासाठी जवळपास ४०० नीट्स ब्राइटनेस.
- कलर गम्यूट कव्हरेज: डीसीआय-पी३ ११४ टक्के, आरईसी २०२० ८३ टक्के.
- अपवादात्मक कलर अचूकतेसाठी १.०८ इतके कमी कलर डेल्टा ई, आकार ४३ इंच, पिक्चर क्वॉलिटीबाबत कोणतीच तडजोड नाही.
- कॉम्पॅक्ट अपार्टमेंट्सपासून एैसपैस लिव्हिंग रूम्सपर्यंत प्रत्येक कुटुंबासाठी डिझाइन करण्यात आलेला प्रीमियम अनुभव, आकार ४३ इंच, ५० इंच व ५५ इंच.