क्रिप्टोकरन्सीजना ‘फ्यूचर ऑफ मनी’ मानतात भारतीय : सर्व्हे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ३० जून २०२३ । मुंबई । वेब३ व क्रिप्टो इकोसिस्टमबाबत जनतेला असलेली माहिती आणि त्याबद्दल त्यांची मते जाणून घेण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात ३७ टक्के भारतीय प्रतिसादक क्रिप्टोकरन्सीजना ‘फ्यूचर ऑफ मनी’ मानत असल्याचे तर ३१ टक्के प्रतिसादक ‘फ्यूचर ऑफ डिजिटल ओनरशीप’ व ‘जागतिक आर्थिक इकोसिस्टममध्ये सहभाग घेण्याचा मार्ग मनात असल्याचे निदर्शनास आले आहे. आघाडीची वेब३ सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनी कन्सेन्सिसने आंतरराष्ट्रीय ऑनलाइन रिसर्च डेटा व अॅनालिटिक्स टेक्नॉलॉजी ग्रुप वायओयूजीओव्ही (YouGov)च्या सहयोगाने क्रिप्टो व वेब३ वरील अद्वितीय जागतिक ओपिनियन ऑनलाइन सर्व्हे केला होता.

या सर्वेक्षणामध्ये २६ एप्रिल ते १८ मे २०२३ पर्यंत आफ्रिका, अमेरिका, युरोप व आशियातील १५ देशांमधील १८ ते ६५ वर्ष वयोगटातील १५,१५८ व्यक्तींच्या प्रातिनिधिक नमुन्याचे मत घेण्यात आले, ज्यामध्ये भारतातील १०१३ व्यक्तींचा समावेश होता. सर्वेक्षणामधील निष्पत्ती भारतीय बाजारपेठेसाठी लक्षवेधक चित्र सादर करतात, ज्यामध्ये क्रिप्टोची व्यापक जागरूकता, तसेच क्रिप्टो-नेतृत्वित भविष्यामधील विश्वास सामील आहे.

प्रबळ क्रिप्टो जागरूकता: ९२ टक्के सहभागींनी क्रिप्टोप्रती जागरूकता दाखवली.

क्रिप्टोच्या भवितव्यामध्ये प्रबळ विश्वास: क्रिप्टोशी संबंधित मुख्य संकल्पनांबाबत विचारले असता उद्योगाशी प्रचलित असलेल्या एक-तृतीयांशहून अधिक प्रतिसादकांनी फ्यूचर ऑफ मनी (३७ टक्के) व फ्यूचर ऑफ डिजिटल ओनरशीप (३१ टक्के) म्हणून क्रिप्टोच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला, ज्यामधून सट्टेबाजी (१७ टक्के) किंवा घोटाळे (२० टक्के) संबंधित सहयोगांना मागे टाकले.

क्रिप्टो मालकीहक्क: एक-पंचमांश व्यक्ती सध्या काही क्रिप्टोकरन्सीचे मालक आहेत आणि उल्लेखनीय ५७ टक्के भारतीय प्रतिसादक पुढील १२ महिन्यांमध्ये क्रिप्टोत गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. तसेच ५७ टक्के प्रतिसादकांचा क्रिप्टो पर्यावरणदृष्ट्या अनुकूल तंत्रज्ञान असण्यावर विश्वास आहे.

उत्तर-मध्य आणि पूर्व प्रदेशांचे वर्चस्व: भारतातील उत्तर, मध्य, पूर्व आणि ईशान्य राज्ये (९४ टक्के) क्रिप्टोकरन्सीसाठी सर्वाधिक ट्रॅक्शन दर्शवतात, त्यानंतर पश्चिम (९२ टक्के) आणि दक्षिण (८९ टक्के) प्रदेश यांचा क्रमांक आहे.

डेटा गोपनीयतेबाबत चिंता: ६२ टक्के सहभागी डेटा गोपनीयतेला महत्त्वाचे मानतात, तर ५३ टक्के सहभागींनी इंटरनेटवरील त्यांच्या ओळखीवर अधिक नियंत्रण असण्याची इच्छा व्यक्त केली. ३९ टक्के प्रतिसादकांचा विश्वास होता की कंपनीने त्यांच्या डेटामधून कमावलेल्या नफ्यात त्यांचा वाटा असावा, तर फक्त ३० टक्के प्रतिसादकांचा डेटा आणि वैयक्तिक माहितीसह सध्याच्या इंटरनेट सेवांवर विश्वास आहे.

क्रिप्टो इकोसिस्टममध्ये प्रवेश करण्यासंदर्भात अडथळे: बाजारातील अस्थिरता (४८ टक्के), तसेच घोटाळ्यांची भीती (४४ टक्के) हे प्रवेशासाठी सर्वात महत्त्वपूर्ण अडथळे म्हणून उदयास आले, त्यानंतर इकोसिस्टमची जटिलता (३६ टक्के) आणि त्याचा उद्देश समजून घेण्यात अडचणी यांचा क्रमांक होता.

कन्सेन्सिसचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी जो लूबिन म्हणाले, ‘‘सर्वेक्षणामधून विकेंद्रीकृत विश्वास परिवर्तन उदयास येण्याची पुष्टी मिळते, जो वापरकर्त्यांना व समुदायांना सक्षम करतो. बिल्डरचे युग वेब३ तत्त्वांशी संलग्न आहे, जेथे प्रत्येकजण योगदान देऊ शकतो. कन्सेन्सिसचा बिल्डर्स व डेव्हलपर्ससाठी विश्वसनीय सेवक असण्याचा, तसेच समुदाय सक्षमीकरण व सकारात्मक जागतिक परिणामाला पाठिंबा देण्याचा मनसुबा आहे.’’


Back to top button
Don`t copy text!