स्थैर्य, दि.१९: भारत चीन सीमेवर वाद सुरू
असतानाच एक चिनी सैनिक भारतीय हद्दीत घुसल्यानंतर त्याला पकडण्यात आले आहे.
भारतीय सुरक्षा दलाने या चिनी सैनिकाला पकडल्याची माहिती सूत्रांकडून समोर
आली आहे. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, हा चिनी सैनिक चुकून भारतीय हद्दीत
आला होता.
पँगॉंग
सरोवराच्या दक्षिणेतील 13 प्रमुख डोंगर भागांवर भारतीय सैनिकांचा ताबा आहे.
या ठिकाणी तापमान उणे 25 अंश सेल्सिअस पर्यंत असतानाही भारतीय सैनिकांचा
चोख पहारा आहे. भारत आणि चीन सीमा वाद सुरू झाल्यानंतर त्यावर चर्चा
करण्यासाठी 12 ऑक्टोबर रोजी 11 तासांची बैठक याच ठिकाणी झाली होती. परंतु,
या चर्चेत सुद्धा काहीच तोडगा निघालेला नाही.
भारत
आणि चीन सीमेवर तणाव असल्याने थंडीत सुद्धा चोख पहारा दिला जात आहे.
हिवाळ्यातही भारतीय सीमेचे रक्षण करण्यासाठी भारतीय जवान सज्ज आहेत. यासाठी
अमेरिकेतून उंच ठिकाणी आवश्यक अशा वॉरफेअर किट आणि कपडे मागवण्यात आले
आहेत. अमेरिकेच्या माहितीनुसार, चीनने लडाख येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा
(LAC) वर 60,000 सैनिक तैनात केले आहेत. अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांनी
काही दिवसांपूर्वीच ही माहिती जारी केली होती.
गेल्या 5 महिन्यांपासून तणाव
गेल्या
5 महिन्यांपासून भारत चीन सीमेवर दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये तणाव आहे. 5
मे रोजी पूर्व लडाख परिसरात दोन्ही देशांचे 200 सैनिक समोरासमोर आले होते.
9 मे रोजी उत्तर सिक्कीम परिसरात 150 सैनिक आपसात भिडले होते. 9 मे रोजी
चीनने लडाख सीमेवर हेलिकॉप्टर पाठवले होते. भारत चीन सीमेवरील गलवान
परिसारकत 15 जून रोजी हिंसाचार झाला. त्यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले.
तसेच 40 चिनी सैनिक मारले गेले. पण, चीनने ही बाब अद्याप मान्य केलेली
नाही.