भारतीय निर्देशांकांत सलग दुस-या दिवशी घसरण


 

स्थैर्य, मुंबई, २९ : भारतीय निर्देशांकांत आज सलग दुस-या दिवशी घसरण झाली. एलअँडटी आणि टायटन हे सर्वाधिक नुकसान करणारे निर्देशांक ठरले. निफ्टी ५८.८० अंकांनी घसरून ११,७०० च्या खाली म्हणजेच ११,६७०.८० अंकांवर स्थिरावला. तर दुसरीकडे एसअँडपी बीएसई सेन्सेक्स १७२.६१ अंकांनी घसरून ३९,७४९.८५ अंकांवर स्थिरावला. आज जवळपास १५४२ शेअर्स घसरले, १०१९ शेअर्सनी नफा कमावला तर १७० शेअर्स स्थिर अवस्थेत राहिले.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात एशियन पेंट्स (२.८९%), अल्ट्रा टेक सिमेंट (१.६४%), श्री सिमेंट (१.१२%), एचसीएल टेक (०.८२%) आणि कोटक महिंद्रा बँक (१.१४%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर एलअँडटी (४.९७%), टायटन कंपनी (३.३४%), ओएनजीसी (२.७९%), अदानी पोर्ट्स (३.१५%) आणि टाटा मोटर्स (२.०८%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.

आयटी निर्देशांकाव्यतिरिक्त आज सर्व क्षेत्रीय निर्देशांकांत घसरण दिसून आली. बीएसई मिडकॅप ०.०१%  आणि बीएसई स्मॉलकॅप ०.५५% नी घटला.

मारुती सुझूकी इंडिया लि. : मारूती सुझूकीने २% ची वृद्धी घेत २०२१ च्या वित्तवर्षातील दुसऱ्या तिमाहीत नफ्याची नोंद केली. तर कंपनीच्या कामकाजातील नफ्यात १०.३४% ची वाढ झाली. कंपनीच्या ईबीआयटीडीएमध्ये २०% वाढ झाली. एवढा नफा होऊनही कंपनीचे स्टॉक्स १.४२% नी घसरले व त्यांनी ७,०८४.०० रुपयांवर व्यापार केला.

लार्सन अँड टर्बो लिमिटेड : २०२१ या वित्तवर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीने एकत्रित नफा ५५२०.३ कोटी रुपये नोंदवला. मागील वर्षी या कालावधीच्या तुलनेत तो ११८% जास्त होता. तरीही एलअँडटी कंपनीचे स्टॉक्स ४.९७% नी घटले व त्यांनी ९३४.०० रुपयांवर व्यापार केला. दरम्यान, कंपनीचा वार्षिक एकत्रित ग्रॉस महसूल १२% नी घसरला.

अजंता फार्मा लि. : कंपनीने नोव्हेंबर २०२० नंतर बायबॅक प्रस्तावावर निर्णय घेण्याचे जाहीर केल्यानंतर अजंता फार्माचे स्टॉक्स ३.०४% नी वाढले व त्यांनी १,६४०.०० रुपयांवर व्यापार केला.

कॅडिला हेल्थकेअर लि. : झेडस कॅडिलाने लिनॅग्लिप्टिन टॅबलेट्स ५ मिग्रॅच्या मार्केटिंगसाठी यूएसएफडीएकडून तात्पुरती परवानगी मिळवली. कंपनीचे स्टॉक्स १.३६% नी घसरले व त्यांनी ४१२.८० रुपयांवर व्यापार केला.

इंटरग्लोबल एव्हिएशन लि. : कंपनीने २०२१ या वित्त वर्षातील दुस-या तिमाहीत १९४.८ कोटींचा मोठा तोटा सहन केला. तरीही कंपनीची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली राहिल्याचे नोंदवले. परिणामी कंपनीचे स्टॉक्स २.३०% नी वाढले व त्यांनी १,३२३.४५ रुपयांवर व्यापार केला.

भारतीय रुपया : आज सलग दुस-या दिवशी भारतीय रुपयाने अस्थिर देशांतर्गत बाजारपेठेमुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७४.११ रुपयांचे मूल्य कमावले.

जागतिक बाजार : युरोपियन निर्देशांकाव्यतिरिक्त आज प्रमुख जागतिक बाजार निर्देशांक लाल रंगात स्थिरावले. याचे प्रमुख कारण म्हणजे जगभरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या. त्यामुळे गुंतवणुकदारांना त्यांच्या गुंतवणुकीची चिंता आहे. नॅसडॅकने ३.७३% ची, निक्केई २२५ ने ०.३७% नी तर हँगसेंग कंपनीने ०.४९% नी घट घेतली. तर एफटीएसई एमआयबी आणि एफटीएसई १०० कंपनीचे शेअर्स अनुक्रमे ०.१५% व ०.०४% नी वाढलेले दिसून आले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!