स्थैर्य, मुंबई, दि.०२: भारतीय निर्देशांक इक्विटीजनी दिवसाची सुरुवात फ्लॅट मात्र नकारात्मकतेने केली. तथापि, सुरुवातीच्या घसरणीनंतर निफ्टी निर्देशांक व्यापाराच्या अखेरच्या तासापर्यंत सुधारला. घसरणीनंतर सुधारणा घेत निफ्टी फ्लॅट स्थितीत असूनही सकारात्मक वळणावर येऊन थांबला. अखेरच्या तासात निर्देशांकाने अचानक चढ घेतला. एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की हेवीवेट रिलायन्सने दिवसात उशीराने वृद्धी घेतल्याने हे परिणाम दिसले. यासह, हा स्टॉक मागील सहा सत्रांत वृद्धीच्या दिशेने आहे. तसेच मेटल, ऑटो आणि पीएसयू बँकिंग क्षेत्रानेही निफ्टीला दिवसभरातील नुकसान भरून काढण्यास मदत केली.
ब्रॉडर मार्केट स्थिती: व्यापक बाजारपेठेच्या दृष्टीने, मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी एका टक्क्याने वाढले. मिडकॅप इंडेक्स २६,००० अंकांपुढे प्रथमच पोहोचला. कारण त्याने विक्रमी पातळी गाठली. युपीएल, टाटा स्टील आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्स हे निफ्टी ५० पॅकमधील प्रमुख गेनर्स ठरले. तर आयटीसी, टेक महिंद्रा आणि अॅक्सिस बँक हे प्रमुख लूझर्स ठरले. सेक्टरनिहाय पाहता, निफ्टी पीएसयू बँकेने चढाई करत 3 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावला. तर निफ्टी मेटल, निफ्टी ऑटोनेही वृद्धी घेतली. आयटी, एफएमसीजी आणि वित्तसेवा क्षेत्राने मात्र विक्री अनुभवली.
प्रकाशझोतातील स्टॉक्स: आजच्या हेडलाइन्समधील स्टॉक मदरसन सुमी आणि आयटीसी. त्यांच्या चौथ्या तिमाहीतील निकालांनुसार शेअर्सने परिणाम दर्शवले. निफ्टी ऑटो इंडेक्स एक टक्क्याने वाढला. मदरसन सुमीने या निर्देशांकाचे नेतृत्व केले. कंपनीने तीन पटींने नफा अनुभवल्याने हा स्टॉक १३ टक्क्यांनी वाढला. तर दुसरीकडे आयटीसीच्या वार्षिक नफ्यावर परिणाम झाल्याने आयटीसी ३ टक्क्यांनी घसरला.
जागतिक आर्थिक आकडेवारी: जागतिक आघाडीवर, बेंचमार्क निर्देशांक सुरुवातीचा वृद्धीचा वेग कायम ठेवू शकला नसल्याने, अमेरिकन बाजार संमिश्र स्थितीत विसावला. विदेशी उत्पादनाची आकडेवारी प्रोत्साहनपर असल्याने सुरुवातीला बाजारात उत्साह होता. तर युरोपियन बाजाराने वृद्धीची स्थिती कायम ठेवली. बाजारात फार उलाढाल नसली तरीही तो सकारात्मक स्थितीत दिसला.
दिवसअखेर, संमिश्र स्थितीत निर्देशांक स्थिरावले. सेन्सेक्स ८५ अंक किंवा ०.१६ टक्क्यांनी घसरून ५१,८४९ अंकांवर थांबला. तर निफ्टी जवळपास बदल न होता, तो 15,576 वरच राहिला. खालच्या पातळीवरील खरेदीच्या गतीमुळे नुकसान भरून निघाले. बाजार फ्लॅट स्थितीवर आला. तरीही निफ्टी आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर असून एखाद्या सकारात्मक भावनेमुळे बेंचमार्क निफ्टी इंडेक्स १५७००-१५७५० च्या पातळीपर्यंत जाऊ शकतो. तर उलटपक्षी, येत्या काही दिवसात १५४५०-१५४०० पातळी ही निफ्टीसाठी सपोर्ट लेव्हल ठरू शकते.