इंडियन एक्सलन्स अवार्ड विनायक शिंदे यांना जाहीर


दैनिक स्थैर्य । 24 मे 2025। फलटण । मराठी हिंदी दैनिक अहिल्याराज वर्धापन दिन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त आयोजित इंडियन एक्सलन्स अवार्ड 2025 साठी फलटण येथील विनायक शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी विनायक शिंदे यांना हा अवार्ड प्रदान करण्यात येणार आहे.

दैनिक अहिल्याराज वृत्तपत्राद्वारे सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी इंडियन एक्सलन्स अवार्ड 2025 चे आयोजन करण्यात येते. यामध्ये पत्रकारिता, शिक्षण, साहित्य, सामाजिक, खेळ, राजकीय, सौंदर्य, डॉक्टर , वकील, महिला, सहकार, पतसंस्था, कला या क्षेत्रात कर्तृत्व घडवणार्‍या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. रविवार दि. 1 जून रोजी मलकापूर (बुलढाणा) येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!