भारतीय शास्त्रीय संगीत केवळ मनोरंजन नाही तर आत्मानुभूती : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ डिसेंबर २०२१ । मुंबई । भारतीय शास्त्रीय संगीत केवळ मनोरंजन किंवा करमणुकीचे साधन नसून ती आत्मानुभूती असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

श्री षण्मुखानंद ललित कला व संगीत सभेतर्फे आयोजित कार्यक्रमात शनिवार (दि. ११) राज्यपालांच्या हस्ते शास्त्रीय संगीत क्षेत्रातील देशभरातील ५० युवा कलाकारांना श्री षण्मुखानंद एम एस सुब्बलक्ष्मी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आल्या, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

यावेळी संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेबद्दल राज्यपालांच्या हस्ते चेन्नई येथील दिव्यध्वनी स्कुल ऑफ कर्नाटक म्युझिकच्या संस्थापिका श्रीमती सीता नारायणन यांना सुब्बलक्ष्मी संगीत प्राचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भारतीय संगीतामध्ये स्वर्गीय अनुभूती देण्याचे दैवी सामर्थ्य आहे असे सांगून युवा संगीतकारांनी डॉ सुब्बलक्ष्मी यांच्या नावाने मिळालेली शिष्यवृत्ती एक जबाबदारी आहे याची जाणीव ठेवून कठोर परिश्रम व अभ्यासाच्या माध्यमातून उत्तम संगीतकार व्हावे, असे राज्यपालांनी सांगितले.

षण्मुखानंद सभा युवा कलाकारांना शिष्यवृत्ती प्रदान करून देशाच्या संस्कृती, संगीत व कला संवर्धनाचे महत्वपूर्ण काम करीत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी षण्मुखानंद सभेचे अध्यक्ष डॉ व्ही शंकर यांनी प्रास्ताविक केले तर उपाध्यक्ष डॉ व्ही रंगराज यांनी आभारप्रदर्शन केले.


Back to top button
Don`t copy text!