स्थैर्य, मुंबई, दि. 19 : 1941-45 मधे झालेल्या युद्धात सोवियतने मिळवलेल्या यशानिमित्त 24 जून 2020 रोजी आयोजित संचलनात भारतीय लष्कर सहभागी होणार आहे. तिन्ही दलाच्या तुकड्यांमध्ये सर्व श्रेणीतील एकूण 75 जण कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मास्कोच्या रेड स्केअर इथे होणाऱ्या संचलनात भाग घेणार आहेत.
ब्रिटीशांच्या अधिपत्याखालील भारतीय सेना ही उत्तर आणि पश्चिम आफ्रिका, पश्चिम वाळवंटी प्रदेश आणि युरोपिय मोहिमेत भाग घेणाऱ्या दोस्त राष्ट्रांच्या फौजेतील मोठी तुकडी होती. या मोहिमांमध्ये साधारणतः सत्त्याऐंशी हजार भारतीय जवानांनी प्राण गमावले तर 34,354 जण जखमी झाले.
भारतीय लष्कर सर्व आघाड्यावर नुसतेच लढले नाही, तर दक्षिण, ट्रान्स इराणी लेन्ड-लिज रुटवर शस्त्रास्त्रे, दारूगोळा, उपकरणे तसेच अन्नपदार्थ मदत आणि माल सोवियत युनियन, इराण आणि इराकपर्यंत पोचवण्यातही त्याने कामगिरी बजावली. भारतीय सैनिकांच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी चार हजारच्यावर गौरवपदके प्रदान करण्यात आली. यात 18 व्हिक्टोरिया आणि जॉर्ज क्रॉसचाही समावेश आहे. याशिवाय त्या काळी सोवियत युनियनने भारतीय लष्करी दलाच्या शौर्याचा गौरव केला. 23 मे 1944ला निघालेल्या सोवियत युनियनच्या प्रेसिडियमने मिखाइल कालिनिन आणि अलेक्झांडर गोर्किन यांच्या मान्यतेने काढलेल्या फर्मानानुसार रेड स्टार, हा प्रतिष्ठेचा खिताब सुभेदार नारायण राव निकम आणि हवालदार गजेन्द्र सिंग चांद या रॉयल भारतीय सेना सर्विसेस कॉर्पना देण्यात आला.
विजय दिवसाच्या संचालनात भाग घेणाऱ्या तुकडीचे नेतृत्व शूर शीख लाईट इन्फ्रंटी रेजिमेंटचा मेजर दर्जाचा अधिकारी करेल. या रेजिमेंटने दुसऱ्या महायुद्धात शौर्य गाजवले होते. त्याबद्दल त्यांना चार युद्धपदके आणि दोन मिलिटरी क्रॉस यांसह इतर शौर्यपदके मिळाली होती.