कोव्हॅक्सीन लस अधिक प्रभावी बनवण्यासाठी भारत बायोटेक करणार ‘या’ औषधाचा वापर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.६: देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतात लस विकसित करण्यात येत आहे. कोरोनावरील लस विकसित करत असलेल्या भारत बायोटेकच्या लसीची सध्या दुस-या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. अशातच भारत बायोटेकनं एक महत्त्वाची माहिती दिली आहे. कोव्हॅक्सीन या लसीत भारत बायोटेक असं औषध वापरणार आहे ज्यामुळे प्रतिकारक शक्ती अधिक आणि मोठ्या कालावधीसाठी वाढणार आहे.

भारत बायोटेक आपल्या कोव्हॅक्सीन या लसीत Alhydroxiquim-II या औषधाचा वापर करणार आहे. Alhydroxiquim-II सहाय्यक म्हणून काम करणार असून त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती अधिक वाढणार आहे. सध्या या लसीची दुस-या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. तसंच लवकरच या लसीची तिस-या टप्प्यातील चाचणीही सुरू केली जाणार आहे.

ऑक्टोबर महिन्यापासून लखनऊ आणि गोरखपूरमध्ये ‘कोव्हॅक्सीन’ची तिस-या फेजची चाचणी सुरु होणार असल्याचे उत्तर प्रदेश सरकारनं यापूर्वी जाहीर केलं होतं. “ऑक्टोबर महिन्यापासून लखनऊ, गोरखपूरमध्ये भारत बायोटेकने विकसित केलेल्या ‘कोव्हॅक्सीन’ लसीची तिस-या फेजची चाचणी सुरु होईल” अशी माहिती उत्तर प्रदेशचे प्रधान आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी यापूर्वी पत्रकार परिषदेदरम्यान दिली होती.

“सध्या अशा सहाय्यक घटकांची गरज आहे जे अधिक अॅन्टीबॉडी रिस्पॉन्स तयार करू शकतात. यामुळे पॅथोजिंसपासून अधिक काळासाठी सुरक्षा मिळणार आहे. व्हायरोवॅक्ससोबत आमची भागीदारी ही भारत बायोटेकच्या सुरक्षित आणि प्रभावी लस विकसित करण्याचा परिणाम आहे. अधिक काळासाठी रोग प्रतिकारक शक्ती मिळावी यासाठी काम केलं जात आहे,” अशी माहिती भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एल्ला यांनी सांगितलं.

भारतच नाही तर संपूर्ण जगाला कोरोना संकटाचा विळखा बसला आहे. कोरोनावरची लस नेमकी कधी येणार याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती देशाचे केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दोन दिवसांपूर्वी दिली. सरकारकडून जुलै २०२१ पर्यंत देशातील २५ कोटी जनतेला कोरोनाची लस दिली जाऊ शकते असं त्यांनी म्हटलं होतं. “जुलै २०२१ पर्यंत २५ कोटी लोकांना लस देण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. सरकारडे ४०० ते ५०० कोटी डोस उपलब्ध होतील. त्यातील २५ कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण होईल” हा अंदाज हर्षवर्धन यांनी वर्तवला होता.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!