दैनिक स्थैर्य । दि. ०९ फेब्रुवारी २०२१ । मुंबई । क्लॅश ऑफ टायटन्स हा बहुप्रतीक्षित गेम भारतीय वापरकर्त्यांसाठी कस्टमाइज करण्यात आला असून त्याचे अलीकडेच भारतात उद्घाटन झाले. हा गेम २३ डिसेंबर २०२१ रोजी अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्म्सवर आला असून तो विशेषतः मोबाइल/ हँडहेल्ड साधनांसाठी विकसित केलेला भारतातील पहिलावहिला मल्टीप्लेयर ऑनलाइन बॅटल अरेना (मोबा) आहे.
अनेक गेमर्सनी आपल्या पीसीवर रोमांचक मोबा स्वरूपातील गेम्सचा आनंद घेतला आहे. क्लॅश ऑफ टायटन्स प्रथमच भारतीय गेमर्ससाठी आपल्या मोबाइलवर हा अत्यंत खास मोबा गेम प्ले अनुभव आणत आहे. त्यामुळे खेळाडूंना गेमचा आनंद कुठेही- कधीही घेता येईल.
मोबा गेम्स हे अत्यंत रोमांचक, अटीतटीचे, योजनेवर आधारित असतात, जिथे खेळाडूंच्या दोन टीम्स पूर्वनिश्चित युद्धाच्या मैदानात एकमेकांशी स्पर्धा करतात. यातील स्पर्धकाची बाजू कोणती आहे त्यानुसार त्याचे मूळ उद्दिष्ट ठरते. ते आहे विरोधकाच्या मैदानाच्या विरूद्ध दिशेला उभ्या असलेल्या मुख्य तळाला नष्ट करणे. या गेमची रचना अशा रितीने करण्यात आली आहे की, खेळाडू आपल्या मोबाइल/ हँडहेल्ड साधनावरील फक्त दोन बटणांचा वापर करून आपले योद्धे नियंत्रित करतो आणि लढाईत सामील होऊ शकतो.
‘टायटन्स’ हे योद्धे असून त्यांचा वापर खेळाडूंना या अत्यंत रोमहर्षक मोबा लढायांमध्ये करता येतो. गेममध्ये विविध प्रकारच्या खेळाडूंच्या भूमिका वर्गीकृत केलेल्या आहेत आणि गेममध्ये प्रत्येक आठवड्याला नवीन टायटन्स आणले जातील. प्रत्येक टायटनमध्ये स्वतःच्या विशेष क्षमता असतात आणि त्यांचा वापर विरोधकावर अत्यंत बारीकपणे नियोजित हल्ल्यांसाठी केला जाऊ शकतो. या गेमच्या सखोल टायटन रोस्टरमध्ये अत्यंत विश्वासू रणगाडे, लढाऊ योद्धे, प्राणघातक हल्ले, खिळवून ठेवणारी शस्त्रे, पद्धतशीर काम करणारे मार्क्समॅन आणि प्रोअॅक्टिव्ह सपोर्ट टायटन्स आहेत.
गेमर्ससाठी गेममध्ये रममाण होण्याचा अनुभव देण्यासाठी गेममध्ये एक अत्यंत सुलभ वापरण्याची क्षमता आहे. त्यात विविध प्रकारची वैशिष्टे देण्यात आली आहेत. त्यातील काही वैशिष्टे खालीलप्रमाणे आहेत:
क्लासिक ५व्ही५ मोबा युद्ध: युद्धात सहभागी होण्यासाठी अगणित टायटन्स उपलब्ध आहेत. त्यांना नवीन आकर्षक पोशाखाद्वारे सजवून युद्धासाठी तयार केले जाऊ शकते.
मॅसिव्ह मेगा किल: प्रचंड वेगवेगळे हल्ले जे लढ्यात नंतरच्या काळात रिफ्रेश केले जातात. त्यांचा वापर उत्साहाची पातळी वाढवण्यासाठी मेगा किल स्प्रीचे साधन म्हणून करता येईल.
धोरण बनवा आणि जिंका: तुमच्या विरोधकांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे टायटन्सचे वर्गीकरण करा. युद्धे जिंकण्यासाठी उत्तम धोरणे आखा. गेमप्लेच्या माध्यमातून स्पर्धकांना विविध प्रकारचे नवीन टायटन्स जिंकता येतील. त्याशिवाय, मर्यादित काळाच्या उपक्रमांमध्ये प्लेयर्सना टायटन्स, स्किन्स अनलॉक करणे आणि इतर भेटवस्तू मोफत मिळतील.
क्लॅश ऑफ टायटन्सच्या लँडस्केप्समधील सर्वाधिक खास आणि ऐतिहासिक लढे ऑफरिंग्समध्ये दिसतात. भारतीय गेमर्सना मोबा या जगातील सर्वाधिक खिळवून ठेवणाऱ्या गेमिंगच्या स्वरूपांपैकी एका स्वरूपात आणि मोबाइल फोनवर प्रथमच गेम्सचा आनंद घेण्यासाठी सहभागी करून घेण्यासाठी प्रेरित केले जात आहे. तुमच्या टायटन स्क्वाडला नवीन टायटन्स आणि मोफत पोशाख तसेच दर आठवड्याला आकर्षक पुरस्कार मिळवून प्रेरित करा.