स्थैर्य,नवी दिल्ली,दि ११: LAC वर अनेक दिवसांपासून सुरू असलेला तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनदरम्यान सहमती झाली आहे. दोन्ही देश पूर्व लडाखच्या पँगॉन्ग लेक परिसरातून आपापले सैनिक परत घेण्यास तयार झाले आहेत. भारत आणि चीन 3 दिवसांपर्यंत दररोज 30% सैनिकांना परत बोलावणार. तीन फेजमध्ये सैनिक परत येतील. करारानुसार दोन्ही देशांचे सैनिक एप्रिल-मेमध्ये तैनात केलेल्या पोझिशनवर परत येतील. गलवान घाटीमध्ये 15 जूनला सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक हाणामारीनंतर दोन्ही देशांनी आपले हजारो सैनिक बॉर्डरवर तैनात केले होते.
6 नोव्हेंबरला चुशूलमध्ये कमांडर लेव्हलच्या बातचीत मध्ये डिसइंगेजमेंटवर चर्चा झाली. भारताकडून परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव नवीन श्रीवास्तव आणि डायरेक्टरेट जनरल ऑफ मिल्ट्री ऑपरेशन ब्रिगेडीयर घई बातचीत मध्ये सामील झाले होते.
आधी टँक, नंतर सैनिक परत येतील
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक आठवड्यापर्यंत झालेल्या बातचीत नंतर ठरले की, ही मूव्हमेंट तीन टप्प्यात होईल. यानुसार, पहिल्या टप्प्यात टँक, आर्म्ड वाहने आणि सैनिकांना सीमेपासून ठरलेल्या अंतरावर नेले जाईल. दुसऱ्या टप्प्यात पँगॉन्ग लेकच्या नॉर्दर्न बँकेपासून सलग तीन दिवस दररोज 30 टक्के सैनिक परत बोलवले जातील. यानंतर भारतीय सैनिक आपल्या अॅडमिनिस्ट्रेटिव्ह धन सिंह थापा पोस्टजवळ येतील. तर, चीन फिंगर 8 च्या आपल्या आधीच्या पोझिशनवर जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात दोन्ही देशांना पँगॉन्ग तलावाजवळील दक्षिण भागासोबतच चुशूल आणि रेजांग लाच्या आसपासचा परिसर सोडावा लागेल.
परतीवर दोन्ही देशांचे लक्ष्य असेल
सैनिक परत येत असताना दोन्ही देश यावर मॉनिटरिंग करतील. यासाठी दोन्ही देश सोबत मिळून एक मॅकेनिज्म बनवण्यास तयार झाले आहेत. यात एकमेकांसोबत बातचीत सोबतच लक्ष्य ठेवण्यासाठी अनमॅन्ड एरियल व्हीकल (UAV) चा वापर करतील.