
स्थैर्य, मुंबई, दि. १४: आज बेंचमार्क इंडेक्स निफ्टी आशियाई बाजारातील संकेतांमुळे सपाट ते निगेटिव्ह उघडला, पण कामकाज सुरू होताच निर्देशांक वेगाने गडगडले, ज्यामुळे निफ्टी इंडेक्स १५६०० च्या स्तराजवळ पोहोचला. एंजेल ब्रोकिंग लिमिटेचे मुख्य सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की रिलायन्स आणि आयटी व पीएसयू बँकिंग शेअर्समधील वृद्धीमुळे निर्देशांकात दिवसाच्या न्यूनतम स्तरावरून २०० अंकांची रिकव्हरी झाली. निर्देशांकाने आपल्या नुकसानाची भरपाई केली आणि दिवसाचा शेवट अगदी नाममात्र वृद्धीने झाला. निफ्टी बँक इंडेक्सने, ५०० पेक्षा जास्त अंकांच्या वसूली नंतरही दिवसाचा शेवट मात्र दुसर्या दिवशीही कमजोरच केला.
व्यापक बाजारांकडे पाहता, स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांकांनी निफ्टी आणि सेन्सेक्स या प्रमुख निर्देशांकांना कमजोर करत दोन दिवसांची वाढ खालच्या स्तरावर आणून बंद केली. सेक्टोरल आघाडीवर रियल्टी, मेटल्स आणि प्रायव्हेट बँक इंडेक्समध्ये विक्रीमुळे सेंटिमेंट प्रभावित झाल्या, तर निफ्टी आयटी आणि निफ्टी पीएसयू बँक इंडेक्स आपली आघाडी कायम रखण्यात यशस्वी झाले आणि हिरव्या रंगावर बंद झाले. स्टॉक विशिष्टबद्दल बोलायचे झाल्यास निफ्टी निफ्टी ५० पॅक मधील ५० पैकी २५ स्टॉक हिरव्या रंगावर बंद झाले. टाटा मोटर्स, रिलायन्स, विप्रो १% पेक्षा जास्त आघाडीसह टॉपवर राहिले आणि अदाणी पोर्ट्स, कॉल इंडिया आणि कोटक बँक टॉप लूझर्समध्ये समाविष्ट होते.
चर्चेतील स्टॉक्स: डीएलएफ आणि बीएचईएल शेअर्स अनुक्रमे ३% आणि ११%पेक्षा जास्त कोसळले, ही घसरण त्यांच्या चौथ्या तिमाहीच्या कारणाने झाली. हे निकाल शुक्रवारी संध्याकाळी उशिरा जाहीर करण्यात आले होते. त्या व्यतिरिक्त, अदाणी समूहाचे सर्व सहा सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स एका रिपोर्टनंतर दडपणाखाली आले होते आणि नॅशनल सिक्योरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने या समुहाच्या चार कंपन्यांमध्ये हिस्सा ठेवणार्या तीन विदेशी फण्ड्सची खाती गोठवून टाकली. अदाणी पोर्ट्स आणि अदाणी एंटरप्राइझेस हे दोन्ही इंट्राडेमध्ये २०% पेक्षा जास्त गडगडले.
ग्लोबल डेटा आघाडी: जागतिक आघाडीवर अमेरिकन बेंचमार्क निर्देशांक शुक्रवारच्या सत्राच्या तुलनेत जेमतेम थोड्याशा वाढीने बंद झाले, ज्यात एसअँडपी ५०० एका नवीन विक्रमी स्तरावर पोहोचला आणि टेक हेवी नॅस्डेक एक महिन्याच्या आपल्या सर्वोत्तम क्लोझिंग स्तरावर पोहोचला. निदेशकांसाठी हा संमिश्र आठवडा होता. नॅस्डेकमध्ये १.८ टक्के आणि एसअँडपी ५०० मध्ये ०.४ टक्के वाढ झाली, पण डाउमध्ये ०.८ टक्के घसरण झाली. तीन मुख्य निर्देशांकांचे फ्यूचर्स फ्लॅट नोटवर कारभार करत होते तर डाउ जोन्स फ्यूचर्स ०.११ टक्के खाली, नॅस्डेक फ्यूचर्स ०.३० टक्के आणि एसअँडपी ५०० फ्यूचर्स ०.०२ टक्के वर होते. युरोपियन आघाडीवर निदेशांक एफटीएसआय, सीएसी ४० आणि डीएएक्स आत्तापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर कारभार करत आहेत.
थोडक्यात, इंडेक्स हेवीवेटमध्ये खरेदी सुरू झाल्याने निर्देशांकांमध्ये प्रारंभिक घसरणीच्या नंतर झपाट्याने सुधारणा झाली आणि हिरव्या रंगात नाममात्र वृद्धीने बंद झाले. बीएसईचा ३० शेअर्सवाला सेन्सेक्स निर्देशांक ७६ अंकांच्या आघाडीसह ५२५५१ वर बंद झाला, जी बंद होण्याची एक विक्रमी उच्च पातळी आहे. त्याच प्रमाणे, निफ्टी ५० इंडेक्स दिवसाच्या खालच्या स्तरापासून २०० पेक्षा जास्त अंकांच्या आघाडीने पहिल्यांदा १५,८०० च्या वर १५८११ वर बंद झाला. निफ्टीवर वरील बाजूस १५८५०-१५९०० आणि खालच्या बाजूस १५६००-१५५५० ह्या स्तरांवर लक्ष ठेवले पाहिजे.