दैनिक स्थैर्य । दि. १८ ऑगस्ट २०२२ । फलटण । फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे 75 वा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्ताने विविध स्पर्धा व कार्यक्रमाद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण उपाध्यक्ष मे.गव्हर्निंग कौन्सिल , फलटण एज्यूकेशन सोसायटी फलटण मा.श्री अशोक जिवराज दोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी मुधोजी हायस्कूल च्या इयत्ता ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थांनी अनेक स्पर्धेत सहभाग नोंदवून आपले कलागुण सादर केले. यामध्ये चित्रकला, रांगोळी व मेहंदी याचे भव्य दालन खोली क्र. ५ ते ८ मध्ये उभारण्यात आले होती. याचे उद्घाटन उपाध्यक्ष गव्हर्निंग कौन्सिल , फलटण एज्यूकेशन सोसायटी फलटण अशोक जिवराज दोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी इतर मान्यवर उपस्थित होते.
या कलादालनासाठी कला शिक्षक बापूराव सुर्यवंशी व त्यांचे सहकारी चेतन बोबडे, गोफणे, हुंबे, सौ. एस सस्ते, सौ. आगवणे यांनी अथक परिश्रम घेतले. कलादालनाचे उद्घाटन झाल्यानंतर नंतर ते विद्यार्थी, पालक व नागरिक यांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले. हे कलादालन पाहण्यासाठी विद्यार्थी पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. तसेच यावेळी
राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) च्या विद्यार्थांनी शपथ घेतली. संचलन ही केले. यांना मागदर्शन श्री पवार यांनी केले.
तसेच यावेळी प्राचार्य गंगवणे यांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपविभागीय दंडाधिकारी फलटण शिवाजीराव जगताप, तहसीलदार फलटण समीर यादव यांनी या कलादालनास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज च्या विद्यार्थी व शिक्षकांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबवलेल्या विविध कार्यक्रमाचे व स्पर्धांचे विशेष कौतुक केले.
तसेच यावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ही करण्यात आले होती. या स्पर्धेचे उद्घाटन फलटण नगरपरिषद शाळेचे मुख्याध्यापक पवार सर व काशिद यांनी केले. यावेळी प्रशालेचे प्राचार्य गंगवणे बाबासाहेब, उपप्राचार्य ए वय ननावरे, पर्यवेक्षक शिवाजीराव काळे व मार्गदर्शक शिक्षक जगताप, परहर, शिंदे, अभंग व विद्यार्थी उपस्थित होते.
तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज अंतर्गत फलटण एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांच्या संघांना निमंत्रित करून सिक्स साईड हॉकी स्पर्धा व फुटबॉल स्पर्धेचे आयोजन श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल येथे यावेळी करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मे. गव्हर्निंग कौन्सिलच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष शिवाजीराव घोरपडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू कु.अक्षता ढेकळे हिला या स्पर्धा उद्घाटनासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते.
तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य गंगवणे बाबासाहेब, उपप्राचार्य मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फडतरे, उपप्राचार्य मुधोजी हायस्कूल ननावरे ए . वाय., फुटबॉल सीनियर कोच संजय फडतरे, क्रीडा समितीचे सचिव सचिन धुमाळ, क्रीडा शिक्षक बी. बी. खुरंगे, अमोल नाळे, सुरज ढेंबरे, धनश्री क्षीरसागर, अमित काळे, पद्मसिंह निंबाळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुजीत जमदाडे, आर. बोबडे, बी. खुरंगे यांनी केले.