बारामती येथील ज्ञानसागर गुरुकुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये “स्वातंत्र्य दिन” उत्साहात संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ ऑगस्ट २०२२ । बारामती । ज्ञानसागर गुरुकुल सावळ,(बारामती) येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. ध्वजारोहण श्री.दत्तात्रय येळे (पी डी सी बँक संचालक ) यांच्या हस्ते झाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर्षानिमित्त विद्यालयामध्ये विविध उपक्रमा अंतर्गत विविध गुणदर्शन कार्यक्रम यात विद्यार्थ्यांची परेड, समूहनृत्य देशभक्तीपर, पथनाट्य ,लेझीम, पिरॅमिड, डंबेल्स त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषातील थोर क्रांतिकारक व समाजसुधारकांची लहान विद्यार्थ्यांनची पात्रे तसेच विद्यार्थ्यांनी केलेली भाषणे तीनही भाषांमधील भाषणे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण व वैशिष्ट्य ठरले.

यावेळी श्री.दत्तात्रय येळे यांनी आपल्या मनोगतामध्ये प्रत्येक भारतीयांने आपल्या देशासाठी आपआपल्या परीने देशसेवा करावी तसेच पालकांनी आपल्या पाल्यामध्ये व विद्यार्थ्यांमध्येही राष्ट्रहिताचे बाळकडू व संस्कारक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले.
संस्थापक अध्यक्ष प्रा.सागर आटोळे यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व व क्रांतिकारकांचे बलिदान, त्याग या बाबींची जाण ठेवून विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच देश सेवेसाठी तत्पर राहिले पाहिजे,असे मनोगत व्यक्त केले.त्याचप्रमाणे कला शिक्षक श्रीराम सावंत यांनी अप्रतिम रांगोळी व फलकलेखन केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कोमल काळे, आभार प्रदर्शन प्रा.श्री.दत्तात्रय शिंदे यांनी शिक्षक मनोगत मध्ये श्री. सुहास चव्हाण व विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिना विषयी भाषणे केली.या कार्यक्रमाचे सुनियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख अर्चना भगत व इतर सर्व शिक्षकांनी केले.

यावेळी संस्थेचे सचिव मानसिंग आटोळे, उपाध्यक्षा रेशमा गावडे,संचालिका पल्लवी सांगळे, दिपक सांगळे, दिपक बिबे, वर्षा भरणे सीईओ संपत जायपात्रे,विभाग प्रमुख गोरख वणवे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, निलिमा देवकाते, स्वप्नाली दिवेकर, राधा नाळे व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,पालकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!