
देशभक्तीच्या वातावरणात कटफळ येथे स्वातंत्र्य दिन साजरा
स्थैर्य, बारामती, दि. 19 ऑगस्ट : कटफळ येथील अजितदादा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. देशभक्तीपर गीते, घोषणाबाजी, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि विद्यार्थ्यांच्या वेशभूषा यामुळे शाळेचे वातावरण देशभक्तीने भारावून गेले होते.
ध्वजारोहण प्रमुख अॅड. गुलाबराव गावडे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते झाले. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कार्यक्रम सादर केले. इयत्ता सहावी-सातवीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक संचलन तर नववी-दहावीतील विद्यार्थिनींनी जोशपूर्ण लेझीम सादर केली. लहानग्यांपासून बारावीपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. गुणवंत व गौरवशाली विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या प्रसंगी अॅड. गुलाबराव गावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष नानासाहेब मोकाशी, अध्यक्ष संग्रामसिंह मोकाशी व सचिव संगीताताई मोकाशी, सदस्या श्रद्धाताई मोकाशी, चंद्रभागा कॉलेज ऑफ फार्मसी चे प्रिन्सिपल डॉ.विनोद पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे श्रेया सिंग आणि भावना माळी यांनी वर्गशिक्षक पंकज खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. मुख्याध्यापक प्रशांत वणवे यांनी आभार व्यक्त केले.
वंजारवाडीत ज्येष्ठ महिला व सेवा निवृत्त पोलीस यांच्या हस्ते ध्वजारोहण
बारामती : वंजारवाडी (ता. बारामती) येेथे स्वातंत्र्य दिनानिमित्त सरपंच जगन्नाथ वणवे यांनी ध्वजा रोहनचा मान गावातील ज्येष्ठ महिला यांना दिला. यानिमित्त त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. श्रीमती यमुनाबाई ज्ञानदेव आव्हाड, श्रीमती छबुबाई देवबा चौधर, श्रीमती वैशाली नवनाथ चौधर व श्रीमती सईबाई चौधर यांनी झेंडा वंदन केले. सेवा निवृत्त पोलीस निरिक्षक भगवान चौधर यांच्या हस्ते अंगणवाडी शाळेतील ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी उपसरपंच चिन्मयनंदा नितीन चौधर, सदस्य गोरख चौधर सागर दराडे, बाळासाहेब ठोकळे, ग्रामसेवक निलेश लवटे पोलीस पाटील पोपट चौधर व नितीन चौधर, शरद चौधर, महेश चौधर,संतोष चौधर,अशोकराव सूर्यवंशी, गोवर्धन गवारे व जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा भालेराव व शिक्षक,विद्यार्थी उपस्तीत होते. ज्येष्ठ महिला, विधवा, परितक्त्या यांना समाजात आदराचे स्थान मिळण्यासाठी तसेच ज्येष्ठ महिलांच्या हस्ते करून सामाजिक परिवर्तनचा संदेश देत असल्याचे सरपंच जगन्नाथ वणवे यांनी सांगितले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप
बारामती : जैनकवाडी (ता. बारामती) येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जैनकवाडी तसेच अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अक्षय पवार, प्रशांत माने, पंकज पवार, अमित सूर्यवंशी, रवींद्र गिरमकर, चैतन्य पवार, शिवम पवार आदी उपस्थित होते
जेष्ठ नागरिक निवास येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात
बारामती : बारामती ज्येष्ठ नागरिक निवास येथे स्वातंत्र्यदिनी वृद्धाश्रमाचे अध्यक्ष किशोर मेहता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी बारामती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माधव जोशी, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक नितीन शेंडे, बारामती सहकारी दूध संघाचे माजी अध्यक्ष संजयराव कोकरे, माजी मुख्यध्यापक सूर्यकांत भालेराव , वृद्धाश्रमाच्या खजिनदार डॉ. सौ. सुहासिनी सातव संस्थेचे विश्वस्त डॉ. श्री अजित आंबर्डेकर , संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र बोरावके, सेक्रेटरी फखरूद्दीन कायमखानी, उपखजिनदार. डॉ. अजिंक्य राजेनिंबाळकर, विश्वस्त अमित बोरावके, विश्वस्त सौ. योजना देवळे, व्यवस्थापक गणेश शेळके व
संस्थेतील निवासी, कामगार उपस्थित होते.